Thursday, April 25, 2024
Homeनगरआद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांना अभिवादन

आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांना अभिवादन

अकोले |प्रतिनिधी| Akole

आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांना ज्या ठाणे जेलमध्ये फाशी दिली त्याठिकाणी दि. 2 मे रोजी सालाबादप्रमाणे जाऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदराजंली अर्पण केली.

- Advertisement -

त्यावेळी ठाण्याचे आमदार डॉ. निरंजन डावखर, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते मनोहर डुंबरे, लक्ष्मण साबळे, रामनाथ भोजणे, वसंत पिचड, मुरलीधर पिचड, पुणे जिल्ह्याचे तुळशिराम भोईर, गोविंद साबळे, डॉ. सुपे, तळपे, मोखाड्याचे सभापती व उपसभापती, तसेच ठाणे जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाणे जेलमध्ये कै. आर. आर. पाटील यांच्या कृपेने कोनशिला बसविली आहे. ती कोनशिला मोडकळीस आल्यामुळे चांगल्या दर्जाची नविन कोलशिला बसविण्यात यावी, असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ना. दिलीपराव वळसे पाटील यांना फोनद्वारे कळविले.

स्वातंत्र्यवीरांना ठाणे जेलमध्ये फाशी दिली आहे त्यांचे पुतळे बसाविण्यात यावे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आदरांजली वाहून त्यांचा सन्मान करावा. राज्य शासनाने स्वातंत्र्यविरांचे स्मारक उभारण्याचे कबुल केले आहे. ठाणे महानगरपालिकेने आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे चौकात सुशोभिकरण करून आदराजंली अर्पण केली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह राज्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी कबुल केले की, आदिवासी पाडा आहे तिथे आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचे स्मारक एक वर्षात उभारण्यात येईल.

आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्या पुढील वर्षी 175 व्या आदराजंलीच्या कार्यक्रमानिमित्त माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ना. दिलीपराव वळसे पाटील यांना विनंती केली की, पुढील वर्षी आपल्या हस्ते कार्यक्रम व्हावा व तसे वळसे पाटील यांनी मान्य केले. कै. डॉ. गोविंद गारे या लेखकाने आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधून काढून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्याचा कार्यक्रम कै. डॉ. गोविंद गारे व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सुरू केला आहे. त्यास 25 वर्षे पूर्ण होणार असून हा योगायोग आहे. शेवटी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्यावतीने आदराजंली अर्पण केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या