Sunday, May 5, 2024
Homeनाशिककामगारविरोधी कायद्यांचा निषेध

कामगारविरोधी कायद्यांचा निषेध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मोदी सरकारने शेतकरी विरोधी बिल व कामगार विरोधी बिल राज्यसभेत मंजूर करून घेतले.

- Advertisement -

अतिरिक्त वेळामध्ये शेतकरी विरोधी बिल व कामगार विरोधी बिल राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले, ही लांच्छनास्पद बाब भारताच्या इतिहासात नमूद केली जाईल. त्याचप्रमाणे मोदी सरकारने कामगारांना मिळालेले अधिकार मोडीत काढण्यासाठी चार मोठे कोड तयार करण्याचे ठरविले असून, मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कामगारांना कोणीच वाली उरला नसल्याचा आरोप सीटू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला.

नवीन कायद्यात असलेल्या तरतुदीमुळे कामगारांचे सर्व अधिकार समाप्त होणार असून, तीनशे पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांना कामगार कायदे लागू होणार नाहीत. त्यामुळे कामगारांनी करायचे तरी काय हा मोठा यक्षप्रश्न कामगारांचा समोर उपस्थित झालेला आहे. नाशिक जिल्ह्यात यापूर्वीच भांडवलदारांनी थैमान घातले असून, त्याच्यात भर म्हणून नवीन आता हा कामगार विरोधी कायदा मोदी सरकारने मंजूर केला असल्याचा आरोप सीटूचे नाशिक जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे यांंनी केला.

कामगार आयुक्तालयासमोर निदर्शने करून मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी कामगार उपायुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात कामगारांचा जीव घेणारा औद्योगिक संबंध कायदा रद्द करावे, मोदी सरकारने मंजूर केलेले शेतकरी हितविरोधी कृषी विधेयक रद्द करावे, रोजगार व उत्पन्न बुडालेल्यांना दरमहा 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे,

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण रद्द करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी कॉ.सिताराम ठोंबरे, कॉ.शिवाजी भावले, कॉ.संतोष काकडे, कॉ.भागवत डुंबरे, कॉ.एम.डी. सूर्यवंशी, कॉ.अजय पवार, कॉ.कल्पनाताई शिंदे, कॉ.तुकाराम सोनजे, कॉ.सतीश खैरनार आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारची धोरणे ही कामगार विरोधी असल्याचा आरोप करत इंडिया सिक्युरीटी प्रेस मजदुर संघ, वर्क्स कमेटी, वेल्फेअर फंड कमेटी व एम्प्लॉईज क्रेडीट सोसायटीतर्फे येथील मजदुर संघाच्या कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. केंद्र सरकारची धोरणे ही सातत्याने कामगार विरोधी आहेत. कामगार कायद्यांद्वारे सरकार कामगारांची मुस्कटदाबी करत आहे.

करोनाचे निमित्त करुन सरकार कामगार वर्गाविरुध्द आणि सामान्य जनतेविरुध्द पावले उचलत आहे. त्यामुळे देशातील विविध कामागार संघटनांनी एकत्र येऊन सरकारच्या विरुध्द देशभर आंदोलन केल्याचे संयोजकांनी सांगितले.

यावेळी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदिश गोडसे, राजेश टाकेकर, दिनकर खर्जुल, नंदु पाळदे, उत्तम रकिबे, कार्तिक डांगे, अविनाश देवरुखकर, संदिप व्यवहारे, इरफान शेख, अनिल थोरात, शिवाजी कदम, दयाराम कोठुळे, चंद्रकांत हिंगमिरे, भिमा नवाळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या