Friday, April 26, 2024
Homeनगर'समृद्धी महामार्गा'च्या बांधकाम कंपनीचे गेट आंदोलकांनी केले बंद

‘समृद्धी महामार्गा’च्या बांधकाम कंपनीचे गेट आंदोलकांनी केले बंद

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील चांदेकसारे (Chandekasare) परिसरात समृद्धी महामार्गाच्या (Maharashtra Samruddhi Mahamarg) कामासाठी गायत्री कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीमार्फत समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे.

- Advertisement -

अनेक परिसरातील व्यवसायिकांनी डंपर , ट्रॅक्टर जेसीपी मशीन या कंपनीकडे कामासाठी लावलेली आहे. मात्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून व्यावसायिकांचे पेमेंट केले नाही. त्यामुळे कर्जाऊ व शेती विकून घेतलेले साधने बँक (Bank) व फायनान्सच्या (finance) तगादे मुळे ओढून नेण्याची वेळ व्यवसायीकावर आली आहे. दोन वेळेस आंदोलन करून कंपनीने सोमवार दि 1 रोजी मे महिन्यापर्यंतचे पेमेंट करणार असल्याचे आश्वासन गायत्री कंपनीचे अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र काल पर्यंत पेमेंट वर्ग न झाल्यामुळे व्यवसायिकानी मंगळवारी गायत्री कंपनीचे काम बंद ठेवत गेट बंद आंदोलन केले.

व्यावसायिकांच्या वतीने सुधाकर होन व बाजीराव होन यांनी बाजू लावून धरत कंपनीकडे वेळोवेळी थकीत पेमेंटची मागणी केली. मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष करत व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपये थकवले. परिसरातील भूमिपुत्रांची साधने कंपनीच्या कामावर जोपर्यंत समुध्दी महामार्गाचे काम चालू आहे तोपर्यंत ठेवण्याचे आश्वासन या कंपनीने दिले होते. मात्र कंपनीने परिसरातील सर्व साधने काल बंद केली व परिसरातील व्यावसायिकांवर मोठा अन्याय केला त्यामुळे आंदोलन करण्यात आले असल्याचे होन यांनी सांगितले. जोपर्यंत परिसरातील बंद केलेली साधने कंपनी परत कामावर घेत नाही व कोट्यावधी थकलेले पेमेंट जोपर्यंत कंपनी देत नाही तोपर्यंत कंपनीचे कोणतेही काम चालू देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय.

वृत्तसंकलन – लक्ष्मण जावळे

- Advertisment -

ताज्या बातम्या