Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअघोषित निर्यातबंदीने कांदा उत्पादक संकटात

अघोषित निर्यातबंदीने कांदा उत्पादक संकटात

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

कांद्याचे बाजार भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा पावसाळी व दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात सडला. तो कांदा उघड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

शिल्लक असलेल्या कांद्याचे उत्पादन खर्च वाढले आणि कांद्याचे बाजारभाव तीन हजार रुपयांवर गेले. केंद्र सरकारने निर्यात होणारा कांदा हा मुंबई पोर्टवर आणि बांगलादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने या अघोषित निर्यातबंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला आहे.

यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू ठेवावी आणि कांद्याच्या बाजारभाव कोसळतील असे कुठलेही निर्बंध लादू नये, अन्यथा संपूर्ण राज्यभरात रस्तारोको, रेलरोकोसारखे तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशाराच दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या