Friday, April 26, 2024
Homeधुळेपशुधन पर्यवेक्षकाला मारहाणीचा निषेध

पशुधन पर्यवेक्षकाला मारहाणीचा निषेध

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकाच्या मारहाणीचा पशुवैद्यकीय संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फेे निषेध करण्यात आला.

- Advertisement -

संबंधीतांवर कडक शासन व्हावे, अशी करण्यात आली आहे. यामागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली.

मागण्यांचे निवेदन जिल्हाप्रशासनामार्फत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांना पाठविण्यात आले आहे.

निवेदना म्हटले आहे की, राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एफएमडीसीपी ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी, उत्स्फूर्तरित्या डॉ. उत्तमराव शिरसाठ (पशुधन पर्यवेक्षक, राज्यस्तरीय पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-2 शिनोली ता.आंबेगाव जि. पुणे) हे आंबेगाव येथे दि. 5 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जनावरांना सक्तीचे लाळ खुरकुत लसीकरण व कानाला बिल्ला आणि ऑनलाईन डाटा एन्ट्रीचे कर्तव्य पार पाडत होते.

तेव्हा अत्यंत शिवराळ व अर्वाच्च भाषा दूरध्वनीवर वापरून व धमकीने गावात बोलावुन त्यांचे वाहन ताब्यात घेतले. त्यांना त्यांच्या जमावाने ताब्यात घेऊन, धक्काबुक्की व मारहाण केली. या घटनेचा संघटेनेने जाहीर निषेध नोंदविला आहे.

तरी पशुवैद्यकांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे. तसेच आरोग्य सेवेतील वैद्यकीयांंवर रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानवी हल्ले, नुकसान व वागणूक अपमान संदर्भात असलेल्या कायद्यामध्ये पदवीधर व पदविकाधारक पशुवैद्यकांचा समावेश होऊन, संबंधितांवर कारवाई व गुन्हे नोंदविण्यात यावेत. तसेच राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम अंमलबजावणीत अडथळा करणार्‍यांवर कडक शासन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे डॉ. संजय पाटील, डॉ.सुदाम भामरे, डॉ. हंसराज देवरे, डॉ.रमण गावित, डॉ. रमेश उकांडे, डॉ. नरहर पाटील, डॉ. एम.बी. माळी, डॉ. किरण माळी, डॉ. किरण जोशी, डॉ.एम.बी. चौधरी, डॉ. एस.जी. राठोड व डॉ. के.व्ही. बागुल आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या