Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिक्षकांना पदोन्नतीची दिवाळी भेट

शिक्षकांना पदोन्नतीची दिवाळी भेट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील सरळसेवा भरतीने आलेल्या उपाध्यापकांना दिवाळीत मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देवून त्यांना दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने सुरू केला आहे. पदोन्नतीसाठी पात्र असणार्‍या उपाध्यापक यांची तालुकानिहाय सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली असून यादी अंतिम झाल्यावर पदोनन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेत सरळसेवेने भरती झालेल्या उपाध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सेवाज्येष्ठतेनूसार पदोन्नतीसाठी पात्र असणार्‍या उपाध्यापकांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्या यादीवर सध्या हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हरकती घेण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून ती पुन्हा प्रसिध्द करण्यात येणार आहे.

यात साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधी जाणार असून त्यानंतर संबंधीत यादी ही पदोन्नती समितीकडे जाणार आहे. त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी पात्र असणार्‍यांची नावे अंतिम करण्यात येणार आहेत. यामुळे पात्र असणार्‍या उपाध्यपकांना मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळणार आहे. ही प्रक्रिया दिवाळीच्या आत किंवा दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

प्राथमिक शिक्षण विभागात सध्या मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र आणि सेवाज्येष्ठेनूसार पदोन्नती समितीच्या मान्यतेने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या