Thursday, April 25, 2024
Homeनाशिक5 ते 21 जानेवारी दरम्यान पदोन्नतीचा निर्णय

5 ते 21 जानेवारी दरम्यान पदोन्नतीचा निर्णय

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिकेची गेल्या सात वर्षापासुन रखडलेल्या अधिकारी कर्मचारी पदोन्नती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला आहे. प्रशासनाकडुन अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती मागविण्यात आल्यानंतर आता 5 ते 21 जानेवारीच्या दरम्यान पदोन्नती समितीसमोर पदोन्नतीचा निर्णय होणार असल्याची माहिती आज (दि. 21) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत गेल्या काही वर्षात सव्वा दोन हजाराच्यावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्तीने बाहेर पडल्यानंतर आकृती बंध व आस्थापना खर्च यामुळे नवीन भरती झालेली नाही.

यातच अलिकडच्या काळात तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी सन 2012 मध्ये पदोन्नती कमेटीची बैठक घेऊन पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणुन महापालिका स्वागत कक्षाजवळ फलक लावत ही प्रक्रिया पुर्ण केली होती. यानंतर मात्र सात वर्ष उलटूनही अधिकारी – कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आलेली नव्हती. यातच अनेक अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती न मिळताच त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागले होते.

यातच अलिकडच्या काही महिन्यात परसेवेतील अधिकारी मोठ्या प्रमाणात महासभेला माहिती न होताच हजर झाल्याने पदाधिकार्‍यांत असंतोष निर्माण झाल्याचे महासभेत उमटले होते. तर स्थानिक अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळत नसल्याने संघटना आक्रमक होऊन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या एकुणच घडामोडीनंतर प्रशासनाने आता पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेत सुमारे 4 ते 5 हजार सुमारे 200 संवर्गातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना पदोन्नती देण्यासंदर्भात अधिकारी व कर्मचारी यांची माहिती संकलीत करण्याचे काम करोना काळात आणि मुदत वाढवून करण्यात आली असुन याद्वारे सिनीअरीटी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

अजुनही सुमारे 250-300 अधिकारी-कर्मचार्‍यांनी आपली माहिती सादर केलेली नाही. परिणामी आता आयुक्त जाधव यांनी उपलब्ध माहितीवरुन पदोन्नती कमेटीद्वारे पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी 5 ते 21 जानेवारी अशा तारखा जाहीर केल्या आहे. महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना नवीन वर्षात पदोन्नती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या