Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला चालना: खा. गोडसे

प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला चालना: खा. गोडसे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक (nashik) – तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची ओळख आता औद्योगिक जिल्हा (Industrial District) अशी झाली असून आयमाच्या (AIMA) माध्यमातून येथे येऊ घातलेल्या आंंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला (Job creation) मोठी चालना मिळणार असल्याचेे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी यांनी केले.

- Advertisement -

आयमातर्फे डोंगरे वस्तीगृह मैदानावर आयोजित औद्योगिक प्रदर्शनाचा (Industrial exhibition) आज शेवटचा दिवस असून, उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगम (MIDC CEO Anbalgam) हे विशेष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या माध्यमातून आज काही गुंतवणुकीचे काही नवीन करार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या तीन दिवसांंत आयमा इंडेक्सला (AIMA index) मान्यवरांसह सुमारे 75 हजार नागरिकांनी भेट देऊन गर्दीचा उच्चांक गाठल्याचे चित्र होते. खा. हेमंत गोडसे यांनी रविवारी आयमा इंडेक्सला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. उत्पादनांची माहिती घेत उद्योजकांशी चर्चा केली. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर मंच तयार करून आयमाने त्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आयमाच्या माध्यमातून नाशकात 850 कोटींचे 3 प्रकल्प येणार असल्याने त्याबद्दल त्यांनी प्रदर्शन चेअरमन धनंजय बेळे (Chairman Dhananjay Bele) आणि त्यांच्या टीमचे खा. हेमंत गोडसे यांनी कौतूक केले. प्रारंभी बेळे आणि आयमाचे विद्यमान चेअरमन निखिल पांचाळ यांच्या हस्ते खा. गोडसेंचा सत्कार करण्यात आला.

आयमा इंडेक्सची डिरेक्टरी

यंदाच्या आयमा इंडेक्सच्या सहभागी स्टॉलधारकांची डिरेक्टरी (Directory) बनवण्यात आली असून, या डिरेक्टरीचे प्रकाशन मान्यवरांंच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून उद्योजकांच्या उत्पादनाची ओळख जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी संंपर्क साधण्यासाठी उद्योजकांना सोय निर्माण होणार असल्याचे आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांनी सांगितले.

नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जागेचा शोध : काटकर

नाशिक (nashik) – अंंबड (ambad), सातपूर (satpur) आणि सिन्नर (sinnar) पूर्णतः भरल्यामुळेे नवीन औद्योगिक वसाहत (Industrial estate) उभारण्यास आता नाशिक ते घोटी (ghoti) दरम्यान जागेचा शोध सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (Maharashtra Industrial Development Corporation) सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर (Chief Executive Officer Sanjay Katkar) यांनी दिली. आयमा इंडेक्स 2022 प्रदर्शनाच्या डिरेक्टरीचे प्रकाशन काटकर यांच्या हस्ते तसेच प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, आयमा प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे, निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, ललित बूब, गोविंद झा, योगिता आहेर, राजेंद्र कोठावदे, वरूण तलवार, जितेंद्र आहेर, प्रमोद वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.

नाशकात गोवर्धन येथे 30 एकरमध्ये होणार्‍या‘सिपेट’ या प्रकल्पातून जिल्ह्यातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी दोन हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे. नाशकात होऊ घातलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब(सिइटीपी)चे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. सध्या या टेस्टिंगसाठी भोपाळ व बंगळूरूला जावे लागते. नाशिक जिल्ह्यात ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असून, त्यासाठी 100 एकर जागेची मागणी केली आहे. जागा बघण्यासाठीचे निर्देश जिल्हाधिकारी यांंना प्राप्त झाले आहेत. सध्या पाईपलाईनमध्ये असलेल्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला गती मिळावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

-खा. हेमंत गोडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या