Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याएनसीडीसी केंद्राची प्रगती कौतुकास्पद : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार

एनसीडीसी केंद्राची प्रगती कौतुकास्पद : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मलेरिया इन्स्टिट्यूट ते संसर्गजन्य रोग संस्था (एन. आय. सी. डी.) सुरू झाल्यापासून ते आता नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एन. सी. डी. सी.) ( National Center for Disease Control) म्हणून प्रभावीपणे विकसित झालेली संस्था ही प्रगती खरोखरच कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांनी केले.

- Advertisement -

संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करणे ते त्याच्या नियंत्रणापासून असंसर्गजन्य रोगांपर्यंत त्याच्या कक्षा विस्तारत आहेत. हवामान बदलामुळे प्रादुर्भाव झालेल्या रोगांची तपासणी, रेफरल डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, मनुष्यबळाचे प्रशिक्षण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे इत्यादी मुख्य सूचना आरोग्यतज्ज्ञांची मदत घेऊन केल्या जात आहेत. आपल्या कामाप्रती असलेल्या समर्पणामुळेच एन. सी. डी. सी. चे अधिकारी वर्ग व कर्मचारी अभिनंदनास पात्र असल्याचे नामदार डॉ.भारती पवार यांनी सांगितले.

एन. सी. डी. सी. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला पाठिंबा देत आहे. त्यापैकी एक म्हणजे येणार्‍या अनेक संसर्गजन्य रोगनियंत्रनाचे कार्यक्रम राबविणे (आय. डी. एस. पी.), जो आता महामारी-प्रवण रोगांच्या देखरेखीसाठी आरोग्य माहितीचे संकलन करून (आय. एच. आय. पी.) त्याची गतीशिलता वाढवित आहे.

अँटीमायक्रोबिअल रेझिस्टन्स (ए. एम. आर.) हा एक जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी धोका आहे त्यामुळे सामान्य संसर्गावर उपचार करण्याची क्षमता धोक्यात येत आहे. ‘ए. एम. आर. कंटेनमेंट वरील राष्ट्रीय कार्यक्रमांद्वारे’ एन. सी. डी. सी., ए. एम. आर. यांनी लक्ष ठेवणे आणि इतर ए. एम. आर. नियंत्रण उपक्रमांसाठी राज्य वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्या रुग्णालयांना बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

भारतातील आरोग्य सेवेमध्ये अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. एन. सी. डी. सी.चे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे काम जोमाने व गतीने होण्यासाठी ते अधिक प्रयत्नशील असतील त्यासाठी त्यांच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देते असेही प्रतिपादन मंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री मनसुख मांडवीय, विभागाचे सचिव राजेश भूषण, आरोग्यसेवा महासंचालक डॉ. सुनीलकुमार, अतिरिक्त सचिव आरती आहुजा, सहसचिव लव अग्रवाल आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या