Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकविकास कामांमुळे ग्रामीण भागात प्रगती : थोरात

विकास कामांमुळे ग्रामीण भागात प्रगती : थोरात

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

संगमनेर तालुका (Sangamner taluka) हा सततच्या विकासकामांमुळे राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी (fund) दिला असून या विकासकामांमुळे ग्रामीण भागात (rural area) प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन इंद्रजीत थोरात (Inderjit Thorat) यांनी केले.

- Advertisement -

निमज येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेसाठी (Water supply scheme) 13 कोटी 88 लाख मंजूर झाले असून सुमारे 35 लाखांच्या रस्त्याचे भूमीपूजन (bhumipujan) व ओपन जिमचे उद्घाटन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, शेतकी संघाचे चेअरमन संपत डोंगरे, उपसभापती नवनाथ आरगडे, कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, विलास कासार, तुकाराम गुंजाळ, रामनाथ डोंगरे, नवनाथ कातोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ना. थोरात हे राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानासुध्दा संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने मोठा निधी दिला आहे. तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे.

गावोगावी विकास कामे सुरु आहेत. तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी त्यांनी भरीव निधी दिला असून कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरु आहेत. आगामी काळात होणारी रेल्वे, विविध रस्त्यांचे चौपदरीकरण, निळवंडे कालवे ही कामे तालुक्याची वैभव ठरणार असल्याचे थोरात म्हणाले. प्रास्ताविक अरुण गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचलन योगेश येवले यांनी केले. संदीप गुंजाळ यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या