Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना व्यापार व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्यसाठी कार्यक्रम आखणी

शेतकर्‍यांना व्यापार व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्यसाठी कार्यक्रम आखणी

अहमदनगर | Ahmednagar

१२ डिसेंबर रोजी शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त, अहमदनगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त जिल्हा बैठक श्रीगोंदा फॅक्टरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांना व्यापार व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्यसाठी कार्यक्रम आखणीसह अन्य प्रश्नांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन, राज्यातील ऊस दर, दुध, कांदा निर्यात बंदी, वीज पुरवठा, वन्य प्राण्यांचा त्रास व धोका, बाजार समित्यांमध्ये होणारी शेतकर्‍यांची लूट आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी स्व. शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे. शरद जोशी यांच्या विचाराचा प्रसार करून शेतकर्‍यांना व्यापार व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे.

या बैठकीस नगर व पुणे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील महत्व‍ाच्या पदांवर फेर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. शेतकर्‍याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

संयुक्त बैठक अनिल घनवट यांच्या श्रीगोंदा फॅक्टरी नजिक असलेल्या निवास स्थानी, १२ डिसेंबर रोजी दु. १२ ते ४ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांनी व शेतकरी संघटनेचे काम करू इच्छिणार्‍या तरुणांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन प. महाराष्ट्र शे. संघटनेचे अध्यक्ष, अनिल चव्हाण, प. महाराष्ट्र शेतकरी महिला अघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब आढाव, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय तोरडमल, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रांजणे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या