Friday, April 26, 2024
Homeजळगावप्रा. पौर्णिमा देशमुख यांनी उलगडला अहिल्याबाई होळकरांचा जीवन प्रवास

प्रा. पौर्णिमा देशमुख यांनी उलगडला अहिल्याबाई होळकरांचा जीवन प्रवास

जळगाव jalgaon

नमस्कार मी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) बोलतेय, नूतन मराठा महाविद्यालयात (NUTAN MARATHA COLLEGE) मी सर्वांशी संवाद (Dialog) साधण्यासाठी आलेय. मी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले,(Roads and forts built) अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरामध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा (Lake and Dharamshala) बांधल्या. हे सर्व तुमच्या साठी ,(For you) तुमच्या पिढ्यांसाठी. असे सांगत प्रा. पौणिमा देशमुख (Prof Pournima Deshmukh) यांनी अहिल्या देवीचा जीवनपटच (reveals the life journey) उलगडला.

- Advertisement -

निमित्त होते ते नूतन मराठा महाविद्यालय जळगाव आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणाऱ्या व्याख्यानमालेचे.

नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती म्हणजेच 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेस सुरुवात झाली. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प प्रा. पौणिमा देशमुख यांनी गुंफले.

व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रा पौर्णिमा देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची वेशभुषा परिधान करून त्यांच्याच शब्दांत श्रोत्यांशी संवाद साधला.

अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभुषेत असलेल्या प्रा पौर्णिमा देशमुख यांनी आपल्या विवेचनात त्यांचा जीवनप्रवास, संघर्ष आणि संघर्षपूर्ण वाटेतील अडचणींवर केलेली मात तसेच सती न जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय, युद्धनीती, कौटुंबिक निर्णय, राजकीय डावपेच, सामाजिक उपक्रम अशा अनेक घटनांना उजाळा देत माझा हा वारसा आपण जपून ठेवावा आणि पुढे चालवावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या उपस्थितीत प्रा डॉ इंदिरा पाटील यांनी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा थोडक्यात जीवन परिचय देवून त्यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या नंतर अर्चना सुर्यवंशी व कविता सुर्यवंशी या विद्यार्थ्यांनींच्या गोड आवाजात जिजाऊ वंदनाने नियोजित कार्यक्रमाची सुरुवात झाली.

अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ प्रा. डॉ. डी. आर. चव्हाण यांनी कर्तृत्ववान महिलांच्या चळवळीचे चार टप्पे सांगून अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत भारतभर झालेला मंदिरांचा जीर्णोद्धार, पायविहीरींची निर्मिती आणि नर्मदा परिक्रमा चा विकास तसेच आपल्या कुशाग्र बुध्दी व चतुराईने परतवून लावलेलं राघोबाशी न झालेलं युद्ध अशा अनेक बाबींचा उल्लेख केला..

सुत्रसंचलन प्रा सोनाली राजकुंडल यांनी तर आभार प्रदर्शन प्रा भाग्यश्री पाटील यांनी केले

सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून प्रा. डॉ. इंदिरा पाटील सदर कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख तसेच उर्दू विभाग प्रमुख आफाक शेख यांच्या समवेत सर्व शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या