Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसुरगाणा : प्रा. गावित इन्स्टिटयूट ऑफ स्कॉलर्सचे बेस्ट टीचर

सुरगाणा : प्रा. गावित इन्स्टिटयूट ऑफ स्कॉलर्सचे बेस्ट टीचर

सुरगाणा l Surgana (प्रतिनिधी)

सुरगाणा तालुक्यातील वडपाडा सु. या गावातील केशव गावित यांचा मुलगा प्रा. भगवान गावित हे सद्या पुणे येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी संस्कृतीशी नाळ जोडलेल्या प्रा. भगवान गावित यांचे पदवी (बी. ए.) आणि पदव्यूत्तर शिक्षण (एम. लिब.), ग्रंथालय शास्त्र शिक्षण नाशिक येथे झाले असून यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ग्रंथालय शास्त्रामध्ये, नेट (सहाय्यक प्राध्यापक) परीक्षा पास केली आहे, आपले ग्रंथपालाचे कार्य करता असतांना त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये आपली यशस्वी वाटचाल सुरु केली आहे.

- Advertisement -

आदिवासी समाजाचा एक साधारण मनुष्य पुण्यासारख्या स्पर्धेच्या शहरात आपल्या आदिवासी समाजाचा तसेच आपल्या सुरगाणा तालुक्याचे नाव उंचावत आहे हि एक सुरगाणा तालुक्याच्या दृष्टीने, गावाच्या दृष्टीने आणि त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब मानवी लागेल.

आपले कार्य मनापासून करीत असतांना त्यांनी आदिवासी समाज, शिक्षण, आजूबाजूची परिस्थिती यावर बरेचसे लेखन वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले आहे, याचाच एक भाग समजावा कि काय त्यांची निवड पुणे जिल्हा आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पुणे जिल्हा यांच्या कार्यकारणीमध्ये (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष) म्हणून झाली आहे.तालुक्याच्या व गावाच्या दृष्टीने अतिशय मानाची अशी हि बाब समजावी लागेल.

तसेच त्यांचे आपल्या नोकरीच्या कमीत कमी वेळामध्ये युजीसी (नवी दिल्ली) तसेच स्कोपस जर्नल्स मध्ये मराठी तसेच इंग्रजी असे एकूण ११ संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांचे जवळजवळ ८१ वेगवेगळ्या विषयावर लेख प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या याच कामाची दखल घेत लघु, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांची रजिस्टर असलेली बेंगळुरू, कर्नाटक येथील इन्स्टिटयूट ऑफ स्कॉलर्स या संस्थेने त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार साठी निवड केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या