Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिवसाला ११ हजार ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती; करोना संकट : जिल्हा प्रशासन अलर्ट

दिवसाला ११ हजार ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती; करोना संकट : जिल्हा प्रशासन अलर्ट

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यात करोनाचा स्फोट झाला असून रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख बघता आपात्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाप्रशासन अलर्ट झाले आहे.

- Advertisement -

जिल्ह्याला वैद्यकीय कारणांसाठी १९२५ जम्बो सिलिंडर इतका पुरवठा होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे सद्यस्थितीत ११ हजार ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता आहे.

जानेवारीपर्यंत अटोक्यात आलेले करोना संकटाने पुन्हा डोकेवर काढले असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाला अडिचहजार रुग्णांची भर पडत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठि जिल्हाप्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरवरील रुग्णांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे पालकमंत्री भुजबळ यांनी मागील आठवडयात बैठक घेत कोव्हिड सेंटर, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवरठा व्यवस्था पूर्ण क्षमतेने उभी करा असे आदेश दिले होते. त्याचीच पुर्वतयारी म्हणून आता आक्सिजनची निर्मिती आणि उपलब्धता याची सांगड घातली जात आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत १६ पुरवठादारांकडून ऑक्सिजन निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यास १७.५ मेट्रीक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दिवसाला ११ हजार ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती केली जात आहे.

गरजेपेक्षा पाच पटीने अधिक ऑक्सिजनची निर्मिती होत असल्याने वैद्यकीय व्यतिरिक्त उद्योगधंदे व इतर बाबींसाठीही ऑक्सिजन पुरवला जात आहे. सध्या पुरवला जात आहे. पुढिल काळात रुग्णांची संख्या वाढल्यास ऑक्सिजनची कमतरता नको यासाठि जिल्हाप्रशासन अलर्ट आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या