Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकगोदा प्रदूषणमुक्तीसाठी प्रायोगिक तत्त्वावर तपोवन एसटीपी आणि रामवाडी नाल्यावर प्रक्रिया

गोदा प्रदूषणमुक्तीसाठी प्रायोगिक तत्त्वावर तपोवन एसटीपी आणि रामवाडी नाल्यावर प्रक्रिया

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी व नाल्यातून येणारे गटारीचे सांडपाणी यामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर तपोवनातील एसटीपी व रामवाडी नाला या ठिकाणी ओझोनेशनद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, गोदा प्रदूषणासंदर्भात नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने टोल फ्री हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे.

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार नुकतीच गोदावरी प्रदूषणमुक्तीसंदर्भात व प्रदूषणमुक्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या महापालिका स्तरावरील उपसमितीची बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली.

यात गोदावरी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणार्‍या पाण्याचा बीओडी कमी करण्यासाठी नागपूर येथील ओझोन रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन प्रा. लिमिटेड या खासगी कंपनीने कामाचे सादरीकरण केले होते.

एसटीपीतून बाहेर पडणार्‍या प्रक्रियायुक्त मलजलावर ओझोनची प्रक्रिया करून अतिरिक्त शुद्धीकरण केले जाणार आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मानांकनाप्रमाणे प्रक्रिया केली जाणार आहे. याकरिता ओझोनेशन टेक्नॉलॉजी वापरून बीओडी कमी केला जाणार आहे.

याच प्रक्रियेद्वारे प्रायोगिक तत्त्वावर तपोवनामधील मलनिस्सारण केंद्रातून गोदावरी नदीत येऊन मिसळण्यापूर्वी आणि रामवाडी भागातून नदीत मिसळणार्‍या नाल्यातील सांडपाणी अशा दोन ठिकाणी ओझोनेशन प्रक्रिया केली जाणार असून यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे.

सुरत व वाराणसी या ठिकाणी प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ओझोनेशन टेक्नॉलॉजी वापरून बीओडी कमी केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याचा वापर महापालिकेच्या इतर एसटीपी व नाल्यात केला जाणार आहे.

नाशिक महापालिका प्रशासनाकडून गोदा प्रदूषणमुक्तीसाठी व प्रदूषणासंदर्भात तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आला आहे. यात 18002331982 आणि 7030300300 या टोल फ्री नंबरवर नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत.

तसेच नाशिक महापालिकेच्या ऑनलाईन ग्रीव्हन्स अ‍ॅप यावर छचउ श-लेपपशलीं यावर गोदावरी व उपनद्यांसंदर्भात तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या