Saturday, April 27, 2024
Homeजळगावमाहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया होणार गतिमान

माहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया होणार गतिमान

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठात घेण्यात येणार्‍या सुनावणी व आदेश पारित करण्याची प्रक्रिया आता

विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर माहिती अधिकाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाने ‘निर्णय प्रणाली’ हे स्वॉफ्टवेअर विकसित केले असून या प्रणालीवर सुनावणी घेण्याची व आदेश पारित करण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

के.एल.बिष्णोई, माहिती आयुक्त,नाशिक खंडपीठ, राज्य माहिती आयोग.

‘निर्णय प्रणाली’ या स्वॉफ्टवेअरवर करण्याचा निर्णय कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त यांच्या निर्देशानुसार ,

15 जून 2020 पासून राज्य माहिती आयोगांतर्गत ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठात ऑनलाइन सुनावण्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे माहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया गतिमान होणार असल्याची माहिती विभाग प्रशासनाने दिली आहे.

माहिती अधिकारातील प्रकरणे वेळीच निकाली काढण्यासाठी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडून ‘निर्णय प्रणाली’ स्वॉफ्टवेअर विकसित केल्यानुसार राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात होणार्‍या सुनावणी व त्यानंतर आदेश पारित करण्याची कार्यवाही ‘निर्णय प्रणाली’ या स्वॉफ्टवेअरवर करण्यात येणार आहे.

त्यामुळे राज्य माहिती आयोगाच्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबारसह अहमदनगर आदी पाच जिल्ह्यातील सुमारे पाच ते साडेपाच हजारदाखल असलेल्या अपीलीय अर्जांची सुनावणी प्रकिया प्रलंबीत आहे.

या प्रकियेमुळे माहिती अधिकारातील प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची प्रक्रिया गतिमान होणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या