Wednesday, April 24, 2024
Homeनगर53 ग्रामसेवकांच्या बदल्या

53 ग्रामसेवकांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया (Process for transfer of Zilla Parishad employees) सुरू असून सोमवारी (काल) ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण (Gram Panchayat, Women and Child Welfare), तसेच बांधकाम विभागातील (Construction Department) एकूण 81 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. दरम्यान शनिवार आणि सोमवार मिळून जिल्हा परिषदेच्या (Ahmednagar Zilla Parishad) 115 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असून त्यात सर्वाधिक 53 बदल्या ग्रामसेवकांच्या आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया 20 जुलैपासून नगरला मुख्यालयात ऑनलाईन पध्दतीने सुरू (Launched online at the city headquarters) आहे. पहिल्या दिवशी (दि. 20) सामान्य प्रशासन (General Administration), अर्थ विभाग (Department of Finance), तसेच कृषी विभागातील (Department of Agriculture) 49 जणांच्या बदल्या झाल्या. नंतर 22 जुलैला लघू पाटबंधारे (Minor Irrigation), ग्रामीण पाणीपुरवठा व पशुसंवर्धन विभागाच्या (Department of Animal Husbandry) 11 बदल्या झाल्या. शनिवारी 24 जुलै रोजी शिक्षण विभाग (Department of Education), आरोग्य विभागाच्या (Department of Health) 34 जणांच्या बदल्या झाल्या.

सोमवारी (दि. 26) महिला बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सांख्यिकी 1, पर्यवेक्षिका 7, ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक 53, ग्रामविकास अधिकारी 8, विस्तार अधिकारी पंचायत 1, विस्तार अधिकारी सांख्यिकी 2, बांधकाम विभागातील शाखा अभियंता 5, स्थापत्य अभियंता सहायक 4 अशा एकूण 81 बदल्या झाल्या. काल झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, सभापती सुनील गडाख सहभागी झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आज (दि. 27) आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभाग हे मोठे विभाग असून सर्वाधिक बदल्या या विभागातील कर्मचार्‍यांच्या होत असतात. आज आरोग्य विभागाच्या बदली प्रक्रियेत संपूर्ण दिवस जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या