Friday, April 26, 2024
Homeनगरपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची कार्यवाही सुरू

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची कार्यवाही सुरू

नेवासा l प्रतिनिधी l Newasa

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्गत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी एकूण

- Advertisement -

30 प्रवाहीवळण योजना व 2 राज्यांतर्गत नदी जोड योजना प्रस्तावित असून सदर योजनेव्दारे 19.58 अब्ज घन फूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगरचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री.दि. येवले यांनी सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

भारतीय जनसंसदचे नेवासा तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले यांनी सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्रला वाहून जाणारे पाणी आडवून बोगद्याव्दारे पश्चिम वाहिनी नद्यांमधून दुष्काळी भागात सोडून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करावा या मागणीचे पत्र दि.18 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना पाठविले होते. याच प्रश्नाच्या मागणीसाठी त्यांनी फडणवीस सरकारने काळात रामराव भदगले, डॉ. अशोकराव ढगे, अँड. विठ्ठलराव जंगले, पत्रकार कारभारी गरड यांनी दि.28 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे विधानभवनावर आंदोलन करून तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कडून लिखित आश्वासन मिळविले होते. या पत्राची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतली आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे वतीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगरचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री.दि. येवले यांनी सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्गत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी एकूण 30 प्रवाहीवळण योजना व 2 राज्यांतर्गत नदी जोड योजना प्रस्तावित असून सदर योजनेव्दारे 19.58 अब्ज घन फूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार आहे.

प्रवाही वळण योजन (7.40 टीएमसी)

पश्चिम वाहिनी नदयांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यांत वळविण्यासाठी एकुण 30 प्रवाहीवळणयोजना प्रस्तावित आहेत. या 30 योजनाव्दारे 209.81 दलघमी (7.40 टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. यापैकी 12 वळण योजनांची कामे पुर्ण झाली असुन त्याद्वारे 12.66 दलघमी (0.44 टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येत आहे. 7 योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर असुन योजनांद्वारे 56.03 दलघमी (1.98 टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यांचे प्रस्तावित आहे. उर्वरित 11 प्रवाही वळण योजना भविष्यकालीन असुन या 11 योजनांद्वारे 141.09 दलघमी (4.98 टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यांचे प्रस्तावित आहे.

पश्चिमवाहिनी दमणगंगा, पार, वैतरणा व उल्हास नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या योजनांचा तपशील असा…

राज्यांतर्गत नदी जोड (2 प्रवाही वळण योजना 12.18 टीएमसी) योजनेत राज्याअंर्गत नदी जोड योजनेमध्ये दमणगंगा एकदरे योजनेव्दारे 143 दलघमी (5.05 टीएमसी) तसेच दमणगंगा, वैतरणा, गीदावरी लिंक योजने व्दारे 202 दलघमी (7.13 टीएमसी) असे एकूण 345 दलघमी (12.18 टीएमसी) पाणी आणणे प्रस्तावित आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ही घेतली दखल…

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे जल संसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभागाने सुद्धा रामराव भदगले यांच्या पत्राची दखल घेतली असून जलशक्ती मंत्रालयाने श्री. भदगले यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की,

नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले, डॉ.अशोकराव ढगे, अड.विठ्ठलराव जंगले, कारभारी गरड यांच्या सातत्याने पाठपुराव्याने ही योजना पूर्णत्वास गेल्यास नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यात यश मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या