Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापंचवटी एक्स्प्रेस मधील समस्या सुरूच

पंचवटी एक्स्प्रेस मधील समस्या सुरूच

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकचे व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ( Panchavati Express ) समस्या सुरुच आहेत. पंचवटीतील दोन डब्यातील दिवे दोन दिवस बंद होते. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रात्री मुंबईहून नाशिकला येताना या बोग्यांमधील प्रवाशांना अंधारात प्रवास करावा लागला. विशेष म्हणजे पंचवटी गाडीला मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे महत्वाचा इंटरसिटी ट्रेनचा दर्जा आहे.

- Advertisement -

पंचवटीच्या प्रवाशांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पंचवटी मुंबईहून सहा वाजता नाशिकला निघाली तेव्हा काही दिवे चालू तर काही बंद होते. डी 7 आणि डी 8 हे पासधारकांचे कोच आहेत. गाडी सुटल्यापासून ठाकुर्ली येईपर्यंत दिवे बंद होते. कसारा घाट येईपर्यंत दिवे लागले नव्हते. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर काम सुरु झाले आणि दिवे लागले. सोमवारी पुन्हा याच दोन कोचमध्ये असाच प्रकार घडला.

दिवा ते टिटवाळापर्यंत दिवे लागत नव्हते. तक्रारीनंतर दिवे सुरु झाले. पंचवटी आणि जालन्याची जनशताब्दीसाठी एकच गाडी (रेक) वापरला जातो. शनिवारी जालन्याहून जनशताब्दी ही गाडी मनमाडला रात्री आली. रविवारी मनमाडहून पंचवटी म्हणून ती मुंबईला गेली. तेथून रविवारी जालन्याला जनशताब्दी म्हणून गेली. सोमवारी जालन्यावरून जनशताब्दी म्हणून मुंबईला आली. सोमवारी रात्री पंचवटी मुंबईहून निघाली तेव्हा पुन्हा या दोन कोचमधील दिवे बंद झाले होते.

प्रवाशांनी सांगितले की, दोन डब्याला जोडणारी वीजेची वायर चोरीला गेली. त्यामुळे ही आपत्ती आली. गाडीची देखभाल होत नाही. दोन दिवस मिळूनही काम केले नाही. अंधारात चोरी किंवा अन्य घटना घडली तर जबाबदार कोणाला धरायचे. नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारी म्हणाले की, आम्ही गाडीतील दिवे व दुरुस्तीची कामे करत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या