Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसमस्या दिंडोरीची: दिंडोरी चौफुलीवरील दुकानदार धुळीने त्रस्त

समस्या दिंडोरीची: दिंडोरी चौफुलीवरील दुकानदार धुळीने त्रस्त

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी (dindori) चौफुली ही एक समस्याग्रस्त चौफुली बनली असून वाढत्या वाहतूक कोंडीबरोबर (Traffic jam) पालखेडला (palkhed) जाणारा रस्ता तसेच निळवंडीकडे जाणारा रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून खड्ड्याच्या (potholes) प्रादुर्भावामुळे त्यात मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

परंतू तो प्रयत्न उन्हाळ्यांमध्ये (summer) दुकानदारांसाठी तापदायक ठरत आहे. रस्त्यावरील धुळीचे (dust) साम्राज्य वाढल्याने धुळीपासून बचाव करण्यासाठी दुकानदारांना ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर पाणी (water) मारण्याची वेळ आली आहे. यातून कधी सुटका होणार ? असा सवाल दिंडोरीकर विचारत आहेत. दिंडोरी चौफुलीवरील समस्या काही मिटायला तयार नाही. एका मागून एक समस्या तयार असतात. समस्याग्रस्त असलेली चौफुली केव्हा समस्यामुक्त होणार असा केविलवाणा प्रश्न दिंडोरीकरांना पडला आहे.

वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायतीने (nagar panchayat) व सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) पुढाकार घेतला आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात ही येणारी वेळच सांगेल. दिंडोरी चौफुली ते मोहाडी (mohadi) रस्त्यावरील एक कि.मी. रस्ता तसेच निळवंडी कडील एक कि.मी. रस्त्याची जणू काही संबंधित विभागाला विसर पडला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक कि.मी. पुढील रस्ता दोन्ही बाजूचे डांबरीकरण (Asphalting) पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी काम चालू आहे. परंतू या एक कि.मी. च्या अंतरात संबंधित विभागाला विसर कसा पडतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

या ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य झाल्याने त्या खड्ड्यामध्ये मुरुम टाकण्यात आला आहे. वाहने जावून या मुरुमाचेही मातीत रुपांतर झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वाहने जातांना धूळ (dust) उडत असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात (rainy season) खड्ड्यांमध्ये पाणी साचते तर उन्हाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये टाकलेल्या मुरुमामुळे धुळीचे साम्राज्य पसरते. तेव्हा व्यावसायिक दुकानदारांनी करावे की काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्डे झाल्यावर त्यात पाणी साचते व येणार्‍या जाणार्‍या वाहनामुळे त्या खड्ड्यातील पाणी उडून दुकानदारांना त्याचा त्रास होतो तर उन्हाळ्यात हे खड्डे भरल्यामुळे धुळीचा त्रास दुकानदारांना सहन करावा लागतो.

यावर पर्याय म्हणून दुकानदार रस्त्यावर पाणी मारतांना दिसत आहे. रस्त्यावर चिखल केला जात धूळ उडणार नाही हा त्यामागील दृष्टिकोन आहे. परंतू ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर चिखल होईल तेवढे पाणी दुकानदार आणणार कुठून असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) याकडे लक्ष देवून त्वरित यावर उपाययोजना काढण्यात यावी व दुकानदारांना होणारा त्रासाला आळा घालावा, अशी मागणी स्थानिक दुकानदारांनी केली आहे.

धुळीने होते नागरिकांचे स्वागत

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राबरोबर इतर देशातून भाविक भक्त दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात येतात. त्यांना केंद्राकडे जातांना धुळीने व खड्ड्यांचेच दर्शन होत असल्याचे बोलले जात आहे. निळवंडी रस्त्यावर पंचायत समिती, बाजार समिती, प्रांत कार्यालय, श्री स्वामी समर्थ केंद्र, महावितरण कंपनीचे कार्यालय, शासकीय विश्रामगृह, बीएसएनएलचे कार्यालय आदी महत्त्वाची कार्यालय आहे.

तसेच मोहाडी रस्त्यावरुन पिंंपळगाव बाजार समिती, पालखेड एमआयडीसी, मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, सह्याद्री फार्म, पालखेड धरण आदी महत्त्वाचे ठिकाणे आहेत. परंतू दिंडोरी चौफुलीवर तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक येत असतांना खड्डे युक्त रस्त्यांबरोबर धुळीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नक्कीच दिंडोरी शहराचे नाव बदनाम होते हे तितकेच सत्य ! तरी संबंधित विभागाने याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दिंडोरी शहरातील निळवंडी रस्ता व पालखेड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात उडत असल्याने आमच्या दुकानदारांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दुकानातील वस्तूवर धूळ जावून बसते. त्यामुळे आम्हाला रोज सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर मारावे लागत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून यावर उपाययोजना करावी.

– गोकुळ भोंडवे, स्थानिक दुकानदार, निळवंडी रोेड

- Advertisment -

ताज्या बातम्या