Friday, April 26, 2024
Homeजळगावपशूवैद्यकीय डॉक्टरांना विमा कवच द्या

पशूवैद्यकीय डॉक्टरांना विमा कवच द्या

अमळनेर – Amalner – प्रतिनिधी :

लाळ खुरकत लस जनावरांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकताच कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

- Advertisement -

जनावरांना लसीकरण करून नंबर टँगीकरण करून शासनास माहिती सादर करावयाची आहे. महाराष्ट्र शासनाने १९ वर्षापासून पशुधन पर्यवेक्षक ही पदे भरली नसल्यामुळे पशुवैद्यकीय विभागाकडे आज मनुष्यबळ अत्यंत कमी प्रमाणात आहे .

त्यामुळे हा कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्यांपर्यन्त पोहोचू शकत नाही . अमळनेर तालुक्यातील तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश पाटील यांनी खाजगी पशू वैद्यकीय संघटनेला विचारणा केली की शासनाने पाठवलेला लसीकरण कार्यक्रम आपण खाजगी लोकांनी मिळून कार्यक्रम पूर्ण करून देण्यासंदर्भात आम्ही विचार विनिमय करून होकार दिलेला आहे.

शेतकऱ्यांचे व जनावराचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हे काम करण्यास तयार आहोत. परंतु आताची परिस्थिती पाहता करोना सारख्या आजाराने शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत थैमान घातले आहे.

अशा परिस्थितीत जर का डॉक्टरांना करोनाची लागण झाली तर प्रत्येक डॉक्टरांना प्रशासनाने ५० लाखाचे विमा कवच द्यावे मग ते खाजगी असो अथवा सरकारी दोन्ही डॉक्टरांना लागू करावे अशी अपेक्षा खाजगी पशूवैद्यकीय डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या