Thursday, April 25, 2024
Homeजळगावआरटीई नोंदणीकडे खासगी शाळांनी फिरविली पाठ!

आरटीई नोंदणीकडे खासगी शाळांनी फिरविली पाठ!

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी शिक्षण विभागाकडे माहिती पाठवून नोंदणी करणे गरजेचे आहे. 21 जानेवारीपासून नोंदणी सुरु झाली आहे.

- Advertisement -

शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत 297 शाळांपैकी निम्याच शाळांनी नोंदणी केली आहे. काही शाळांनी अद्यापही नोंदणी केलेली नसल्याने आरटीई प्रवेशाविषयी खासगी शाळांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. दरम्यान, आता आरटीईच्या शाळा नोंदणीसाठी 10 फेब्रवारीची अंतीम डेडलाईन दिेलेली आहे.

शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत मागासवर्गीय अपंग व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश मिळावा, याकरिता प्रवेशक्षमतेच्या 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना 25 टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी दरवर्षी जानेवारी-फेबु्रवारी महिन्यात शाळांनी नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारणे आदी प्रक्रिया पार पाडली जाते. सन 2021-22 या वर्षात 25 टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळावा, याकरिता 21 जानेवारीपासून खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

नोंदणीसाठी 30 जानेवारी ही अंतीम मुदत होती. परंतु मुदतीत अत्यल्प शाळांनी नोंदणी केल्यामुळे या नोंदणीला 10 फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 297 शाळांनी नोंदणी केली. मात्र, अजून काही शाळांनी नोंदणी केली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी दोनच दिवसांचा अवधी शिल्ल्क असून अधिकाधिक शाळांनी नोंदणी करावी. अन्यथा कारवाइला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

सहा गोष्टींची परिपुर्तता आवश्यक

आरटीइ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रहिवासी पुरावा, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र, वीजबिल, रेशनकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा गरजेचा आहे. जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, कुटूंबप्रमुखाचा दाखला, जन्मदाखला, घटस्फोटीत महिला अशा सहा बाबींची पुर्तता करणे गरजेचे आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व सिध्द करणारे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

नोंदणी न केल्यास शिक्षणाधिकार्‍यांकडून कारवाईचा इशारा

सन 20-21 या वर्षात जिल्ह्यातील 287 इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी नोंदणी केली होती. तीन हजारांच्या वर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात आली होती. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, या वर्षी शाळा नोंदणीनंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर राज्यस्थरावर लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. प्रत्येक तालुका स्थरावर पडताळणी समिती नेमण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अंतीम प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. या वर्षी 297 शाळांची नोंदणी अपेक्षित आहे. ज्या शाळा 10 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत खासगी शाळांनी नोंदणी करावी, अशा सूचना गट शिक्षणाधिकार्‍यांमार्फत सर्वांना दिल्या आहेत. गतवर्षी नोंदणी केलेल्या शाळांचे नुतनीकरण केले जाणार आहे. 10 फेबु्रवारीपर्यंत पात्र सर्व शाळांची नोंदणी केली जाईल.

भाऊसाहेब अकलाडे, शिक्षणाधिकारी, जि.प.

- Advertisment -

ताज्या बातम्या