Friday, April 26, 2024
Homeनगरखासगी शाळेचा 'फी'साठी विद्यार्थ्यांना तगादा

खासगी शाळेचा ‘फी’साठी विद्यार्थ्यांना तगादा

वडाळा महादेव (वार्ताहार) –

खासगी शाळांकडून शालेय शुल्कासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात असून अशा शुल्क वसुलीविरोधात

- Advertisement -

त्रिदल सैनिक संघटनेकडून टाळेबंद स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागील 2020 वर्षापासून कोव्हीड 19 रोगाने देशात थैमान घातले असून या साथीमुळे रोजगार आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कित्येक नागरिकावर बेकारीचे संकट उभे ठाकले असतानादेखील खाजगी शिक्षण संस्था मात्र आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी पालकांना सातत्याने फीसाठी तगादा लावत आहेत. पालकांची परिस्थिती लक्षात घेता शिक्षण व्यवस्था आणि शाळा तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण कुठल्याही शाळा सातत्याने सुरु नसून वर्षभर विद्यार्थी घरी बसून आहेत. शाळा आणि शिक्षण व्यवस्थेने ऑनलाईन अभ्यास होणे गरजेचे होते तसा प्रयत्न मात्र झालेला दिसून येत नाही. त्यामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी रेंज प्रोब्लेम वर्षभर झालेला आहे. या सर्व गोष्टीसाठी शिक्षण व्यवस्था व शाळांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असताना व शाळांना शिक्षण व्यवस्थेने योग्य ती समज देणे गरजेचे असताना ती मात्र दिली गेलेली नाही.

शाळा सुरू असताना जे उपक्रम सातत्याने राबवत असतात ते देखील उपक्रम न राबवता चौथीपर्यंत ऑनलाइन आणि पाचवी ते बारावी या टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या आहेत. शाळा मात्र विविध कारणे सांगून वारंवार पालकांना फी भरण्याचे आवाहन करीत आहे. अनेक पालक संकटामधून मार्गक्रमण करत असताना शिक्षण व्यवस्था आणि शाळा यावर विचार करण्यास तयार नाही. तेव्हा शिक्षण व्यवस्था आणि शाळेने आपले धोरण न बदलल्यास खाजगी संस्थेमधील सर्व पालकांना सोबत घेऊन शाळांना सैनिक सेवा संघ टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, याची दखल शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यावी, असे सैनिक सेवा संघाचे नगर उत्तरचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त सुभेदार कृष्णा सरदार, तालुकाध्यक्ष अनिल लगड, सचिव बद्रीनाथ देशमुख, उपाध्यक्ष संग्राम यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या