Saturday, May 11, 2024
Homeनगरइतरत्र खाजगी व्यक्तीकडून अथवा संकेतस्थळावरून दर्शन पासेस घेऊ नये

इतरत्र खाजगी व्यक्तीकडून अथवा संकेतस्थळावरून दर्शन पासेस घेऊ नये

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईभक्तांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी दर्शनाकरिता संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरून व दर्शन पास वितरण काऊंटरवरुनच दर्शन पासेस घ्यावेत.

- Advertisement -

इतरत्र खाजगी व्यक्तीकडून अथवा संकेतस्थळावरून दर्शन पासेस घेऊ नयेत. असे पास घेणे अनुचित असून ते वैध देखील नाहीत. फ्री पासेस किंवा ऑनलाईन पासेस हे ओळखपत्र किंवा भक्तांच्या फोटोसह असतात. त्यामुळे आपली फसवणूक होणार आहे. असे दलाल आपले लक्षात आल्यास त्याची माहिती खालील कंट्रोल रुम तसेच हेल्पलाईनवर देण्यात यावी, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने करण्यात आलेली आहे.

श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. करोना विषाणूच्या संकटामुळे श्रीं च्या दर्शनाकरिता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाकरिता online.sai.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी.

बरेच साईभक्त ऑनलाईन पासेस न घेता शिर्डी येथे येतात. अशा साईभक्तांनी ऑफलाईन दर्शन पासेस घेऊन मंदिरात प्रवेश करावा. ऑफलाईन दर्शन पासेस हे गेट नंबर 02 च्या बाजुला श्रीराम पार्कींग, संस्थानचे साईआश्रम 01, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान व शिर्डी बसस्थानक येथे उपलब्ध असून साईभक्तांनी या दर्शन पास वितरण काऊंटरवरूनच ऑफलाईन दर्शन पासेस घ्यावेत. तसेच सशुल्क दर्शन पासेस गेट नंबर 01 च्या बाजुला दर्शनरांगेतील जनसंपर्क विभागाच्या पास वितरण काऊंटरवरूनच घ्यावे.

साईभक्तांनी शिर्डी येथे येण्यापूर्वी व आल्यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा, देणगी व दर्शनाची परिपूर्ण माहिती करिता व आपली फसवणूक टाळण्यासाठी संस्थानचे हेल्पलाईन मोबाईल नंबर अथवा अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या