Saturday, April 27, 2024
Homeनगरखाजगी हॉस्पिटलची बदनामी; ग्रुप अ‍ॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल

खाजगी हॉस्पिटलची बदनामी; ग्रुप अ‍ॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना पॉझिटिव्ह रुग्णांना साईदीप हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचा

- Advertisement -

खोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी व्हाट्सअप ग्रुप डमिन विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सम्राट गल्ली मित्र परिवार या व्हाट्सअप ग्रुपचा डमिन अभिजित चिपा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी फिर्याद दिली आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्ण गरम पाणी पिण्यासाठी मागत असताना त्याला पाणी पिण्यासाठी दिले जात नसल्याने एक व्यक्ती हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना बोलत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसते.

सदरचा व्हिडीओ साईदीप हॉस्पिटलमधील असल्याचे सम्राट गल्ली मित्र परिवार व इतर ग्रुपवर टाकण्यात आले. परंतु, तो व्हिडीओ आमच्या हॉस्पिटलमधील नसून आमच्या हॉस्पिटलची बदनामी करण्यात आली असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापकांनी फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या