Friday, May 10, 2024
Homeधुळेखाजगी शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना न परवडणारे

खाजगी शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना न परवडणारे

धुळे Dhule। प्रतिनिधी

सध्या खाजगी शिक्षणाकडे (Private education) कल वाढत असून गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना (poor students) ते न परवडणारे (unaffordable) आहे. परिस्थतीला विचारपूर्वक हाताळणे महत्वाचे असते. संवाद कौशल्यांचा विकास (Development of communication skills) कसा करता येईल याचा विचार महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्वरी(Vice Chancellor Dr. V.L. Maheshwari) यांनी केले.

- Advertisement -

येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झुलाल भिलाजीराव महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांचा जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ.अरुण साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरु डॉ.एन.के. ठाकरे, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, प्रदीप भदाणे, प्रा.सुधीर पाटील, प्रा.चंद्रशेखर पाटील, अजित मोरे, डॉ.नीलिमा पाटील, प्राचार्य डॉ.पी.एच. पवारआदी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. माहेश्वरी म्हणाले की, तंत्रज्ञान युगात शिक्षण क्षेत्राकडून समाज व युवकांच्या खूप अपेक्षा आहेत. एक युवक शिकून नोकरी किंवा व्यवसायास लागतो. तेव्हा ते संपूर्ण कुटुंब उभे रहाते व समाजाचा विकास घडतो. विद्यापीठ विकासात प्रत्येकाने प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे. विद्यापीठास आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त व्हावी तसेच विद्यापीठाच्या उन्नतीसाठी विद्यापीठ तसेच परिक्षेत्रातील महाविद्यालय व विद्यार्थी विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन प्रयत्न करणार आहे. यासाठी काळानुसार प्रगती साधण्यासाठी नवनवीन संकल्पना स्वीकारुन ज्याच्या जवळ नवीन आयडिया असतील त्यांनी संपर्क केल्यास जर त्या आयडिया फिजिबल, प्रॅक्टिकेबल व इंप्लीमेंटेबल असल्यास त्यावर निच्छित विचार करुन त्यांचा उपयोग केला जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. एन. के. ठाकरे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विभागातील शैक्षणिक विकासासोबतच समाजातील अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी उमविची निर्मिती झाली आहे. देशात सर्वप्रथम आपल्या विद्यापीठात स्कूल संकल्पना वापरली गेली तसेच आपल्या विद्यापिठातील एमएस्सी पेस्टिसाईड पदवी जगात कुठेच नाही. बदल व्हायला हवेत. चांगल निर्माण करण्यासाठी उभ राहायला हव. संशोधनाला चालना दिली पाहिजे. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा सगळे मदत करतात. विद्यापीठाने सतत उन्नत अवस्थेत असावे अशी इच्छा व्यक्त केली. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.

डॉ.अरुण साळुंके म्हणाले की, शिक्षणमहर्षी झेड.बी. पाटील यांची दूरदृष्टीची साक्ष म्हणजे त्यांनी डॉ.एन.के. ठाकरे यांची जयहिंदच्या प्रथम प्राचार्यपदी नेमणूक केली त्यांची महाराष्ट्र शासनाने उमविच्या प्रथम कुलगुरु म्हणून नियुक्ती केली. ठाकरे हे हाडाचे शिक्षक आहेत म्हणून त्यांनी नानासाहेबांच्या कार्यपद्धतीप्रमाणे जयहिंदचा आणि विद्यापीठ निर्मिती तसेच उज्वल वाटचालीत अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले. जयहिंदने विद्यापीठाच्या निर्मितीत व वाटचालीत नेहमीच योगदान दिले आहे. यापुढेही आवश्यक ते सहकार्य करु असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ.पी.एच. पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य व्ही.एस. पवार, डॉ.वर्षा पाटील, डॉ.डी.के.पाटील,डॉ.पी.एस. गिरासे, डॉ. योगिता पाटील, प्रा.गिरीश देसले, प्रा.अतुल पाटील, डॉ.अमोल पाटील, संतोष ठाकूर, अविनाश वाघ, सखाराम बेलदार, अशोक बागूल, आधार चव्हाण, रघुनाथ पाटील, भानुदास बागल, कमलाकर पाटील, विक्रम वळवी, किसन वसावे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या