Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकखासगी क्लासेस १ जूनपासून सुरु करण्यास परवानगी द्यावी

खासगी क्लासेस १ जूनपासून सुरु करण्यास परवानगी द्यावी

नाशिक । Nashik

राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करायला एक जून पासून परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशन, नाशिक संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, खाजगी कोचिंग क्लासेस करोना संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे नाशिक मधील अंदाजे लहान-मोठे हजारहुन क्लासेस बंद अाहेत. त्यामुळे क्लास चालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्यात आता करोना प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेस लवकर सुरू कराण्यास परवानगी द्यावी.

कोचिंग क्लासेसची तुलना शाळा-महाविद्यालया बरोबर न करता व्यवसाय समजून लवकरात लवकर सुरू करण्याची परवानगी द्यावी. कोचिंग क्लासेस ची शिक्षण उपसंचालक पातळीवर नोंदणी करून घ्यावी.

कोचिंग क्लासेस व्यवसाय ‘एमएसएमई’अंतर्गत व्यवसाय समजून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन आमच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास मदत करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. आम्हाला क्लास सुरू करायला परवानगी मिळाल्यास सर्व अटींचे व विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.

एका बेंचवर एक विद्यार्थी बसवण्याचे आम्ही आश्वासन देतो. परवानगी दिल्यानंतरही पालकांची, विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून सुरळीत क्लासेस सुरू व्हायला बराच वेळ लागेल. त्यामुळे सरकारने क्लासेस सुरु करण्याबाबत सकारात्मकता दाखवावी अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून करोनामुळे शिक्षणक्षेत्र व विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. करोना परिस्थिती सुधारत असून कोचिंग क्लासेस सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

– प्रा.विजय जोशी, जिल्हाध्यक्ष

कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन, नाशिक

सरकारने क्लास सुरू करायला परवानगी द्यावी. परवानगी मिळाल्यास सर्व अटींचे व विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.

– प्रा. यशवंत बोरसे,सल्लागार सीसीटीएफ

- Advertisment -

ताज्या बातम्या