पुणे | Pune
नगर-पुणे महामार्गावर आज पहाटे एका खाजगी खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस अष्टविनायक यात्रेसाठी निघाली होती.
त्यावेळी सकाळी ७ वाजता लोणीकंद येथे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, अपघातात चार ते पाच जण जखमी झालेत. जखमींवर उपचार सुरू असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची कारला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू
दरम्यान, या खासगी प्रवासी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बिबट्यांच्या अवयवाची विक्री करताना वन खात्याच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले
पटली झालेली बस उचलण्यासाठी घटनास्थळी क्रेन दाखल झाली आहे. दरम्यान, पुणे – नगर महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.