Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस नेतृत्वहीन पक्ष; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर

काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर

मुंबई (Mumbai)

गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांच्या राजीनामा दिलं त्याचं दुःख आहे. अनेक वर्षे ते काँग्रेससोबत होते. पक्ष संघटनेत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

- Advertisement -

या नेत्याला पक्ष सोडून जावं लागतं तेव्हा वाईट वाटतं, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. याबरोबरच त्यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेरही दिला. कॉंग्रेस नेतृत्वहीन पक्ष झालाय. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. देश एकाधिकाराकडे निघाला आहे. पंतप्रधान मोदी परत आलेतर लोकशाही धोक्यात येईल असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

ते म्हणाले, सोनिया गांधी होत्या तेव्हा विजय मिळत गेला आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हव होत. निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते मान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत, असा सवाल करत कांग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर निवडणूक घ्यायला हवी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही याबाबत निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे.

गांधी कुटुंबाने दिले. त्यात समाधान: मानले पाहिजे. ही मुघल सलतन आहे का? लोकशाही पद्धतीने नेमणुका होत नाही, याचा गांभीर्याने विचार करणार आहोत का? असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले की, डिसेंबर महिन्यात सोनिया गांधींसोबत आम्ही ५ तास चर्चा केली. त्यात चिंतन शिबिर, निवडणुका घेण्याचे मान्य केले. मात्र, | त्यालाही बराच वेळ झाला. त्यानंतर केरळ, आसाम, यूपी, पंजाबच्या निवडणुकीत पराभव झाला. पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय कुणी घेतला ? असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधी अध्यक्ष असतील तर काय हरकत नाही. मात्र, ते निवडणुकीतून समोर आले पाहिजे. जी- २३ लोकांनी जे पत्र दिले ते गोपनीय पत्र लीक झाले. त्यानंतर राजकारण सुरू झाले.

आमची बंडखोरी करण्याचा विषय नव्हता. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वात छोटा पक्ष होतो आणि महाराष्ट्राने तीन पक्षांचे सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते, त्यामुळे दोन पक्षाचे सरकार चालवताना अनेक अडचणी येत होत्या आणि त्या मी अनुभवल्या आहेत. तीन पक्षाचे सरकार कसे चालवायचे याबाबत शंका होती. पण आम्ही किमान समान कार्यक्रम केला आणि प्रयोग केला. अडीच वर्षे चांगल्याप्रकारे सरकार चाललं, असेही चव्हाण म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या