Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाPrithvi Shaw : अडचणीत वाढ, 'त्या' प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

Prithvi Shaw : अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई | Mumbai

एकीकडे आयपीएल सुरू असतांनाच क्रिकेटपटू पृथ्वी शॉ(Prithvi Shaw) च्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या अडचणीच कारण म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुन्सर सपना गिल सोबतच भांडण. या दोघांत झालेल्या वादात पृथ्वी शॉच्या तक्रारीनं अडचणीत आलेल्या सपना गीलने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर सपना गिल (Sapana Gill)यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी पृथ्वी शॉने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सपनाला अडचणींचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

यानंतर, प्रकरणामुळे तिला काही काळ तुरुंगातही काढावा लागला होता. यानंतर सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करावी, अशी मागणी सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात(Mumbai High Court) केली होती. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने सपनाच्या याचिकेची दखल घेत क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि इतर फिर्यादींना नोटीस पाठवली आहे.तसेच याप्रकरणी उत्तर सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने क्रिकेटर पृथ्वी शॉसह अन्य 11 जणांना नोटीस पाठवली आहे. लवकरच त्यांना या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे.

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

काय आहे प्रकरण?

पृथ्वी शॉ मित्रांसह मुंबईतील हॉटेलमध्ये असताना सपना गिल आणि तिच्या मित्रांचा पृथ्वीसोबत सेल्फी काढण्यावरून हा वाद झाला. पृथ्वी शॉ याने सेल्फी घेण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल येथे असताना सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर यांनी त्याच्याकडे सेल्फीसाठी हट्ट केला. जिथे सेल्फीवरून काही मुला-मुलींसोबत त्याचे भांडण झाले. शॉ याने आधी सेल्फी दिला. मात्र, परत सेल्फी घ्यायला आल्यावर त्याने आपण जेवण करत असल्याचे सांगत सेल्फी दिला नाही. शॉ याने नकार दिल्याने तिथे भांडण झाले. यावेळी सपना आणि तिच्या मित्राने पृथ्वी शॉचा टीशर्ट धरला आणि त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे पृथ्वी शॉ संतापला. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत सपना आणि शोबितपासून पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राला दूर नेलं. हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या सपना आणि शोबित याला हॉटेलबाहेर काढले. याचाच राग आल्यानं दोघांनीही पृथ्वी शॉचा बदला घ्यायचं ठरवलं होतं.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या