संगमनेर कारागृहातील कैदी वापरतात चक्क मोबाईल

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

येथील कारागृहातील कैद्यांना (To inmates in prisons) वेगवेगळ्या सुविधा मिळत असल्याची चर्चा यापूर्वी होत होती. ही चर्चा सुरू असतानाच या कारागृहातील कैदी चक्क मोबाईल वापरत (Mobile Use) असल्याची चर्चा आहे. याकडे तुरुंग अधिकार्‍यांसह पोलिसांचेही दुर्लक्ष (Ignored by the police) झाले आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्याला (Sangmner City Police Station) खेटूनच काही वर्षांपूर्वी नवीन कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहामध्ये 24 कैद्यांची क्षमता आहे. मात्र अनेकदा या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवलेले असतात. यामध्ये जुने व नवीन कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत आहेत. या कारागृहात जुन्या कैद्यांची चांगलीच चलती आहे. नवीन कैद्यांंसह ते कधी कधी कारागृहात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवरही दादागिरी करतात. या कैद्यांना कारागृहात अनेक सुविधा मिळत (Prisoners get many facilities in the jail) असतात. गुटखा, तंबाखू व इतर व्यसनांचे पदार्थ त्यांना सहज उपलब्ध होतात. या वस्तू कोण पुरवतात याबाबत अनेकदा उलटसुलट चर्चा (Discussion) होत असते.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या (Sangmner) कारागृहामध्ये एक छोटासा मोबाईल (Mobile) वापरला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त हातील आले आहे. नेहमी सायलेंट मोडवर असणारा हा मोबाईल संबंधित कैदी रात्रीच्यावेळी वापरतो. दुसरे कैदीही या मोबाईलचा वापर करत असल्याचे चर्चा आहे. कारागृहात मोबाईल गेलाच कसा असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. या कारागृहात जवळून पोलीस (Police) अनेकदा ये-जा करतात. याशिवाय कारागृह बंदोबस्तासाठी नेहमी वेगवेगळ्या पोलिसांची नियुक्ती करण्यात येत असते. तुरुंग अधिकारीही कधीकधी कारागृहात येत असतात. असे असतानाही मोबाईल बाबतची माहिती कोणाच्याही लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित कैद्याला हा मोबाईल दिला कोणी याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. कारागृह लगत असणार्‍या पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांच्या दालनामध्ये असणार्‍या सी. सी. टीव्ही कॅमेरा (CCTV Camera) मध्ये फक्त कारागृहाची बाहेरची बाजू दिसते.आत कैदी काय करतात याची कल्पना अधिकार्‍यांना नसते. तुरुंग अधिकार्‍यांनी जेलमध्ये जाऊन सर्व कैद्यांची झाडाझडती घेतली तर त्यांना निश्चित मोबाईल आढळेल. मात्र तुरुंग अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष झाल्याने कारागृहात अनेक गैरप्रकार (many malpractices) होताना दिसत आहे.

जेलर झाडाझडती कधी करणार ?

संगमनेर येथील कारागृहातील काही कैद्यांची मनमानी वाढली आहेत. कारागृहातील कच्च्या कैद्यांना मारहाण करणे, बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करणे असे प्रकार या कैद्यांकडून होत आहे. याशिवाय परवानगी नसतानाही मोबाईल वापरण्याचे कामही ते करत आहेत. तुरुंग अधिकार्‍यांनी या कारागृहाकडे गांभीर्याने लक्ष देऊन झाडाझडती करण्याची गरज आहे. झाडाझडती तुरुंगाधिकारी कधी करणार? असा सवाल विचारला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *