Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा मृत्यू

मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा मृत्यू

नाशिक । Nashik

अशक्तपणामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

बापूराव अमृता दांडगे (50, बंदी क्र.सी.10198) असे मृत कैद्याचे नाव आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असताना त्यास अशक्तपणा जाणवू लागल्याने जेल प्रशासनाच्या वतीने 29 जानेवारी रोजी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बुधवारी उपचार सुरू असताना वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार राऊत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या