Sunday, May 5, 2024
Homeनगरमुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकेची आत्महत्या

मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकेची आत्महत्या

कर्जत |प्रतिनिधी|Karjat

मुख्याध्यापकाच्या (Principal) जाचाला कंटाळून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zilla Parishad Primary School) शिक्षिकेने (Teacher) मंगळवारी (दि.12) सायंकाळी राहत्या घरी गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संतोषकुमार किसन खंडागळे (रा.शारदानगरी,कर्जत) असे गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर रूपाली अशोक नेवसे (रा.शिक्षक कॉलनी, कर्जत) असे आत्महत्या (Suicide) करणार्‍या शिक्षिकेचे (Teacher) नाव आहे. याप्रकरणी मयत शिक्षिका रुपाली यांचे पती अशोक नामदेव नेवसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की. त्यांची पत्नी रूपाली ही कर्जत (Karjat) शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (Zilla Parishad Primary School) शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एप्रिल महिन्यापासून त्या सतत काळजीत असल्याने विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, शाळेतील मुख्याध्यापक संतोषकुमार किसन खंडागळे हे मैत्रीचा गैरफायदा घेऊन रात्री बेरात्री सतत फोन करून ‘तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझीच आहेस असे वारंवार म्हणुन मानसिक त्रास देत आहे.

जर ही गोष्ट कोणाला सांगितले तर तुझ्या नवर्‍याला मारून टाकीन, तसेच तुझे फोटो सोशल मीडियावर फोटो प्रसारित करून तुझी बदनामी करेल अशी धमकी देत होता. यानंतर मी तसेच नातेवाईकांनी संतोष कुमार खंडागळे यास याबाबत समक्ष भेटून अशा पद्धतीने त्रास देऊ नका असे सांगितले होते.

मात्र मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगा प्रथमेश याचा फोन आला व त्याने आई ने बेडरूम मध्ये गळफास घेतला असून बेडरूमचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर शेजार्‍यांच्या मदतीने बेडरूमचा दरवाजा तोडून पत्नीला खाली उतरवले. तातडीने उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेलो. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून रूपाली ही मयत झाल्याचे सांगितल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी अशोक नामदेव नेवसे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक संतोष कुमार किसन खंडागळे यांच्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या