Tuesday, April 23, 2024
Homeनगरकरोनामुळे अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज - प्राचार्य बखळे

करोनामुळे अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज – प्राचार्य बखळे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राज्यात मार्च 2020 पासून सुरू झालेल्या करोना रोगाच्या संसर्गामुळे (Corona infection) वरिष्ठ महाविद्यालयातील अध्यापन,(Senior college teaching) अध्ययन व मूल्यमापन या घटकावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. करोनाचा संभाव्य धोका अजूनही टळलेला नसल्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल (Radical changes curriculum) करण्यात यावा, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. एस. आर. बखळे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

करोनाच्या संसर्गामुळे महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे ऑफलाईन(offline) ऐवजी ऑनलाईन (Online)अध्यापनाची प्रक्रिया(process) राबविण्यात आली. त्याचबरोबर बहुतांशी वर्गाच्या परिक्षा (Exam) या ऑनलाईन पद्धतीनेच बहुपर्यायी प्रश्राचा वापर करून घेण्यात आल्या आहेत. परीक्षेची ही पद्धती सर्वंकष नसून त्यातून यथोचित मुल्यमापनाची शक्यता फारच कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी वर्गाच्या गुणवत्तेबरोबरच शैक्षणिक क्षेत्राच्या एकूण दर्जावर होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रकार सुद्धा शिक्षण क्षेत्रावर अनिष्ट परिणाम करू शकतो. 15 जून 2021 पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालेले आहे. या शैक्षणिक वर्षातही करोनाचा संसर्ग कमी झाला नाही तर विद्यापीठाकडे अगोदरच अध्यापन तसेच मुल्यमापनाचे नियोजन असणे गरजेचे आहे. तसेच परीक्षा पद्धतीत आमुलाग्र बदल करावयाचा असेल तर अभ्यासक्रमाचे स्वरूप नेमके कसे असावे याबाबत व्यूहरचना असली पाहिजे.

नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे सोपे काम नसले तरी त्याबाबत अगोदर धोरण निश्चीत करणे गरजेचे आहे. संभाव्य परिस्थितीचा आगाऊ अंदाज घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यास मंडळे, सिनेट तसेच व्यवस्थापन परिषदेची तातडीने बैठक बोलावून याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असेही प्राचार्य डॉ. बखळे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या