उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा – प्राचार्य ओहोळ

jalgaon-digital
2 Min Read

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

सध्याच्या स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थी वर्गाने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन प्राचार्य अशोक ओहोळ यांनी केले.

रयत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुणतांबा येथे कला शाखेच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. तोडकर, पर्यवेक्षक संजय थोरात, बीएसएनएल निवृत्त कर्मचारी वाल्मीकराव कुलकर्णी, मनोज गुजराथी, पारधे अंकल, प्रमोद कसबे, ढसाळ व सोनवणेताई विद्यार्थी यांच्या उपस्थितीत होते. इयत्ता बारावीमधील कु.श्रद्धा वाणी, कु. श्रद्धा लोणकर कु. कीर्ती बनकर यांनी आपले शाळेबाबत व शिक्षकांबाबतीत मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या पेपर बाबतीत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान मास्क व शाळेचा युनिफॉर्म परिधान करून येणे असे नमूद केले.ज्युनियर कॉलेजचे तोडकर यांनी विद्यार्थ्यांना पेपर संदर्भात सर्व सूचना दिल्या. रद्द झालेला एक पेपर पुढच्या एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे व कोणताही अनुचित प्रकार विद्यार्थ्यांनी पेपर चालू असताना करू नये, अभ्यास करून सावधगिरी बाळगावी. वाल्मीकराव कुलकर्णी यांनी इयत्ता बारावीनंतर उपयोगात पडणार्‍या कागदपत्रांची झेरॉक्स विद्यार्थ्यांना दिली तसेच त्यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. मनोज गुजराथी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या पालकांचे व शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करावे. जीवनात येणार्‍या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा लोणकर व कु. कीर्ती बनकर या विद्यार्थिनींनी केले, तर आभार ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक तोडकर यांनी मानले. विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला भेटवस्तू देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *