Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशप्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे सम्राट

प्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे सम्राट

दिल्ली | Delhi

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर आज त्यांचे सुपुत्र राजा चार्ल्स तिसरे यांनी अधिकृतपणे ब्रिटनच्या महाराजा पदी शपथ घेतली आहे.

- Advertisement -

भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सेंट जेम्स पॅलेस येथील अॅक्सेसेशन कौन्सिलच्या बैठकीत किंग यांची ब्रिटनचे नवे महाराजा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटनच्या सेंट जेम्स पॅलेस येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले असले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते. या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान ब्रिटनच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये काही नवे बदल होणार आहेत. ब्रिटनचं राष्ट्रगीत बदललं जाणार तसंच प्रिन्स ऑफ्स वेल्सही बदलले जाणार आहे. किंग चार्ल्स हे राजकीय बाबतींमध्ये त्यांचं कुठलही मत व्यक्त करू शकणार नाहीत. तसेच किंग चार्ल्स यांना आता व्होटर कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याची गरज उरणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या