Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशवंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा

वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा

मुंबई | Mumbai

‘मेक इन इंडिया’(Make in India) अंतर्गत तयार करण्यात आलेली वातानुकूलित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-गांधीनगर-मुंबई सेन्ट्रल दरम्यान धावणार आहे…

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकात या गाडीला हिरवा कंदिल दाखवला आहे. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

सहा तास २० मिनिटांत मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर कॅपिटल स्थानक प्रवास पूर्ण होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्सप्रेसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोटॉयलेट अशा विविध सुविधा आहेत.

Navratrotsav 2022 : नाशिकमधील ‘या’ दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर अहमदाबाद येथून दुपारी दोन वाजता ती सुटणार आहे. सायंकाळी ७.३५ वाजता मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला पोहोचणार आहे. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येईल. रविवार वगळता उर्वरित सहा दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या