Friday, April 26, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षकांच्या बदली यादीतील दुरूस्ती सुरू

प्राथमिक शिक्षकांच्या बदली यादीतील दुरूस्ती सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी भरण्यात आलेल्या ऑनलाईन माहिती दुरूस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. ही माहिती आज (बुधवार) अपडेट होणार असून बदल्याच्या प्रक्रियेत फेज एकची प्रक्रिया सुरू असून माहिती दुरूस्त झाल्यावर पुढील आठवड्यात फेज दोन नूसार आंतरजिल्हा पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पारपडण्याची आशा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला आहे.

- Advertisement -

करोनामुळे मागील वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा शिक्षकांच्या बदल्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्यासाठी राज्य पातळीवरून पोर्टल तयार करून त्यात शिक्षकांना स्वत:ची माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, भरलेल्या माहिती काही तांत्रिक चुका झालेल्या असल्याने बदली प्रक्रिया पारपडण्यासाठी नेमण्यात आलेल्या संबंधीत कंपनीने पुन्हा यादी पाठवून शिक्षकांना भरलेल्या माहितीच्या दुरूस्तीसाठी दुसर्‍यांदा वेळ दिला आहे. ही दुरूस्ती होवून शिक्षकांची यादी आज अपडेट होणार आहे.

सध्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी फेज एकची प्रक्रिया सुरू आहे. यात शिक्षकांच्या याद्या तयार करणे, त्यांची माहिती, नावातील दुरूस्ती, सेवा कालावधी, नेमणुकीची दिनांक, मोबाईल नंबर, ई मेल आयडी यासह अन्य आवश्यक माहिती भरून ती अद्यावत करण्यात येत आहे. फेज दोनमध्ये आधी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात ही प्रक्रिया होईल, असा अंदाज आहे. या बदल्या झाल्यावर फेज तिनमध्ये जिल्हातंर्गत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.

जिल्ह्यात सध्या 11 हजार 2 प्राथमिक शिक्षक कार्यरत असून त्यातील सुमारे 1 हजार 200 शिक्षक बदलीसाठी पात्र असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दोन वर्षापासून बदल्या झालेल्या नसल्याने हा आकडा आता 2 हजारांच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. यातून किती शिक्षकांच्या बदल्या होतील हे प्रत्यक्षात आता सांगता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या