Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याप्राथमिक शाळांची घंटा आज खणखणणार

प्राथमिक शाळांची घंटा आज खणखणणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोविड-19 मुळे Covid-19 दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोमवार (दि.13) पासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची Primary Schools घंटा खणखणणार आहे. शहरातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या तर ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

शहरात इयत्ता सातवीपर्यंतच्या 405 शाळांमध्ये एक लाख 85 हजार 279 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळा सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

शहरातील 60 टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 263 शाळा आहेत. तसेच खासगी शिक्षण संस्थांच्या 663 आणि इंग्रजी माध्यम व इतर विभागांच्या अशा एकूण 5 हजार शाळा आहेत. या शाळांची माहिती मागवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे Collector Suraj Mandhareयांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांनी पूर्ण तयारी केली असून, विशेषत: प्राथमिक शाळांनी वर्ग सॅनिटायझेशन, स्वछता, फळ्यांवर स्वागताचे संदेश सजले आहेत. शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तर काही शाळांनी ढोल-ताश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका हद्दितील एकूण शाळा- 405

एकूण विद्यार्थी- 1,85,279

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा – 3263

खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक शाळा – 663

ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यम व इतर शाळा – 1400 (अंदाजे)

- Advertisment -

ताज्या बातम्या