Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजायखेडा आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

जायखेडा आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच्या असभ्य वर्तनुकीमुळे व अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जायखेडा गटप्रमुख पुनम प्रकाश शेवाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्राला टाळे ठोकले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुणाल आहेर, व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षलकुमार महाजन यांनी आश्वासन दिल्यानंतर हे टाळेठोक आंदोलन तब्बल सात तासानंतर मागे घेण्यात आले.

- Advertisement -

वीस ते पंचवीस गावांचा संपर्क असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा नेहमीचाच भोंगळ कारभार आहे. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी डाॅ. उमेश रामोळे एकच वैद्यकीय अधिकारी आहेत, डाॅ. उमेश रामोळेतसेच रेबीज, सर्पदंश आदी लशींसह अनेक औषधांचा सतत तुटवडा असतो.

याचबरोबर संतप्त नागरिकांनी अनेक वेळा डाॅ. रामोळे यांच्या विरोधात तक्रार करूनही वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जायखेडा गटप्रमुख पुनम प्रकाश शेवाळे, जयश्री प्रतीक शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव, प्रकाश शेवाळे, अशोक मोहिते, समाधान कापडणीस, अशोक शेवाळे, दत्ता खैरणार, राकेश बोरसे, कामिल शेख, नामदेव चव्हाण, संदिप ठाकुर, पिलू चव्हाण, ग्रा. पं. सदस्य विजय बच्छाव, हिरामण जगताप, गणेश महाले, भूषण मोरे आदींनी डॉ. हर्षलकुमार महाजन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

डॉ. महाजनांनी यावेळी संबंधित अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामोळे हे दि. १५ व दि.१६ रोजीचा रजा अर्ज न दिल्यामुळे व वरिष्ठांना गैरहजर असल्याबाबत कळविले.

टाळेठोक आंदोलनात ग्रा. पं. सरपंच शांताराम आहिरे, माजी सरपंच शरद जगताप, कैलास वाघ, सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव आदी उपस्थित होते.आरोग्य केंद्रात डाॅक्टरच् नाहीत. दुपारी आंदोलकांनी अचानक दिलेल्या भेटीत जायखेडा आरोग्य केंद्रात कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. जोपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असा पवित्रा घेतला.

जायखेडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती यतीन पगार यांच्याकडे नागरिकांनी डाॅ. उमेश रामोळे तक्रारी केल्या होत्या. याची दखल म्हणून यतीन पगार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. कुणाल आहेर यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे डाॅ. रामोळे विरोधात तक्रार करूनही वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याची यतीन पगार यांनी खंत व्यक्त केली.

मी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. कुणाल आहेर यांच्याशी दूरध्वनीवरून जायखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी व पुरूष वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली असता. याची दखल घेत डाॅ. आहेर यांनी दि. १८ पासून दोन्ही वैद्यकीय अधिकारी-यांची नेमणूक करण्याचे लेखी आश्वासन दिले.

– प्रकाश शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते, जायखेडा

- Advertisment -

ताज्या बातम्या