Friday, April 26, 2024
Homeनगरप्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रश्नांची आमदारांना भूरळ

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रश्नांची आमदारांना भूरळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रश्नांची जणू भूरळच राज्यातील आमदारांना पडली आहे. यामुळे या दोनही विभागाच्या संदर्भात तब्बल दहा तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामाकाजाबाबत चर्चा होणार आहे.

- Advertisement -

यासह जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण आणि ग्रामपंचायत विभागाबाबत प्रत्येकी एक याप्रमाणे यंदा जिल्हा परिषदेच्या चार विभागाबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 12 तारांकित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाबाबत 9 तारांकित प्रश्न आहे. विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नात झेडपीच्या शाळांच्या आवारात आंमली पदार्थांची विक्री होते?, जिल्हा पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षकांना अतिरिक्त वेतन वाढ देण्यात येते का?, उच्च शिक्षित शिक्षकांना (पीएच. डी, सेट, नेट यासह अन्य उच्च पदवी धारक) यांना थेट वरिष्ठ अधिकारी पदावर समावून घेण्यात येत?, जिल्हा परिषदेच्या शाळामधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत करण्यात याव्यात, प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदांची माहिती, ज्येष्ठ शिक्षकांना विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती देतांना सवलत देण्यात येते ? जिल्हा परिषदेच्या शाळेतील विज्ञान शिक्षकांची संख्या वाढवावी, केंद्र प्रमुखांची शंभर टक्के पदोन्नतीने शिक्षकांमधून भरण्यात यावीत, 50 टक्के सरळ सेवेतून ही पदे भरण्यात येवू नयेत. तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या पदाला दिलेल्या मान्यता याबाबत तारांकित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

तसेच महिला आणि बालकल्याण विभागातील रिक्त जांगा तपशील, ग्रामीण भागात असणार्‍या शासकीय जागा ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहे? याबाबतची माहिती राज्यातील विविध आमदारांनी जिल्हा परिषद प्रशासनाला विचारलेली आहे. या विषयाची लेखी स्वरूपात माहिती तारांकित प्रश्नासाठी विधीमंडळाला सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, ग्रामपंचायत आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या संदर्भात विरोधी पक्ष नेते आ. अजित पवार यांच्यासह आ. किशोर दराडे आणि अन्य राज्यातील आमदारांनी तारांकित प्रश्न विचारलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या