Friday, April 26, 2024
Homeनाशिकआवक घटल्याने भाजीपाला कडाडला

आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

मनमाड । बब्बू शेख | Manmad

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फटका इतर घटकांसोबत भाजीपाल्याला (Vegetables) देखील बसत आहे. कडक उन्हामुळे (heat) भाजीपाल्याची आवक कमी (Decreased income of vegetables) होवून भावात वाढ झाली आहे. सर्वात जास्त मिरची, गवार, लिंबू यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपाला देखील महाग झाला आहे.

- Advertisement -

जवळपास सर्वच भाजीपाल्याच्या भावात वाढ (Rising prices of vegetables) होत असतांना दुसरीकडे कांद्याच्या भावात मात्र घसरण सुरूच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion growers) हवालदिल झाला आहे. इंधनापासून घरगुती गॅस सिलेंडर (Domestic gas cylinder) पर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या (Essentials) किंमती गगनाला भिडल्यामुळे गृहणीचे बजेट (budget) कोलमडले आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्यामुळे मनमाडसह (manmad) नाशिक जिल्ह्यात (nashik district) तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ (increase in temperature) होऊन पारा 41 अंशा पर्यंत गेला आहे.

वाढत्या तापमानाचा फटका भाजीपाला पिकांना बसत असल्याने उत्पादनात मोठी घट होत आहे. त्यामुळे सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. पेट्रोल (petrol), डिझेल (diesel), गॅसपाठोपाठ आता भाजीपाला देखील महाग झाला आहे. मटण, मासे, खाद्यतेल, डाळींचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.

याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यांचे बजट कोलमडले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की, ते फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यावर आली होती. आता शेतकर्‍यांच्या मालाला भाव चांगला मिळतोय मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसून उत्पादनात घट होऊन भाव वाढीनंतरही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

रविवारी मनमाडचा आठवडे बाजार असतो. त्यात शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व किरकोळ विक्रेते भाजीपाल्याची दुकाने लावतात. बाजारात इतर वस्तूंसोबत धान्य व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. आज आठवडे बाजारात जवळपास सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र होते. गेल्या आठवड्यात 5 रुपयाला मिळणारी मेथीची जुडी आज 12 ते 15 रुपयात मिळत होती, मिरची 160 रुपये, गवार 120 रुपये, गिलके 80 रुपये, कारले 75 ते 80 रुपये, शेवगा 75 ते 80 रुपये, भेंडी 75 ते 80 रुपये किलो तर मेथी 12 ते 15 रुपये जुडी व लिंबू 8 ते 10 रुपये प्रति 1 नग भाव होता.

उन्हाळ्यात सरबतसाठी लिंबूचा जास्त वापर केला जातो. मात्र यंदा कधी अवकाळी पाऊस तर कधी वादळी वारा; याचा परिणाम लिंबू उत्पादनावर झाला असून कमी आवकेमुळे भाववाढ झाली आहे. दरवेळी कांद्याच्या भावाविषयी ओरड केली जाते. कांद्याच्या भावात थोडी वाढ झाली तरी गल्ली ते दिल्ली सर्वसामान्यांपासून नेत्यांपर्यंत बोंबाबोंब करतात. सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असतांना मात्र याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही, अशी खंत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

भाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड केली जात असली तरी आम्हाला या दरवाढीचा कोणताही फायदा नाही. खते, बी-बियाण्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मजुरी देखील वाढली आहे. त्यात अवकाळी, अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. एकरी 20 ते 25 टक्केच उत्पन्न निघत आहे. त्यामुळे पिकांवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने भाववाढ होऊन देखील आमच्या पदरी काहीच पडत नाही.

– कानो पवार, शेतकरी

महागाई गगनाला भिडली असून बाजारात आल्यावर काय घ्यावं आणि काय नाही; असा प्रश्न पडतो. केंद्र आणि राज्य शासनाने महागाईवर नियंत्रण ठेऊन सर्वांना दिलासा द्यावा.

– दीपाली औटी, गृहिणी

- Advertisment -

ताज्या बातम्या