रिपेअर करण्याच्या बहाण्याने मोटार सायकलची चोरी

jalgaon-digital
2 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

एका व्यापार्‍याची (Traders) रस्त्यात बंद पडलेली मोटार सायकल (Motorcycle) रिपेअर करुन देण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्याने (Thieves) ती चोरुन नेली.

हा प्रकार तालुक्यातील केलवड (Kelwad) शिवारात गारखिळा चौफुली येथे घडला. कोर्‍हाळे (Korhale) येथील व्यापारी चंद्रकांत अंबादास मुर्तडक (वय 47) हे आपली दुचाकी सीडी डीलक्स मॉडेलची मोटारसायकल (Motorcycle) एमएच 17 एपी 5075 ही वरुन 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.15 च्या सुमारास लोहारे ते कोर्‍हाळे असे केलवडच्या गारखिळा चौफुली मार्गे जात असताना त्यांची दुचाकी (Motorcycle) बंद (Close) पडली असता त्याच रोडने पाठीमागुन दोन अनोळखी इसम येवुन फिर्यादी चंद्रकांत मुर्तडक यांना म्हणाले की, तुमची मोटार सायकल चालु करणेस मदत करतो व त्यातील एक इसम मोटार सायकल चालु करणेचा प्रयत्न करु लागला व दुसरा मुर्तडक यांना म्हणाला की, आपण थोडे पुढे चालु तो पाठीमागुन मोटारसायकल चालु करुन घेवुन येईल, असे म्हणुन मुर्तडक यांना काही अंतर रोडने चालवत घेवुन गेला व लघवीचे निमित्त करुन त्या ठिकाणाहुन पाठीमागे निघुन गेला.

ज्या ठिकाणी मुर्तडक यांची मोटारसायकल बंद पडली होती त्या ठिकाणी मुर्तडक यांनी मागे जावुन पाहिले असता तोही मोटारसायकल चालु करुन चोरुन घेवुन गेला. अशी फिर्याद चंद्रकांत अंबादास मुर्तडक यांनी दिल्यावरुन राहाता पोलिसांनी (Rahata Police) अज्ञात चोरट्या विरुध्द राहाता पोलिस ठाण्यात (Rahata Police Station) गु. र. नं. 184/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचे (Rahata Police Station) पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड (PI Sunil Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. बी. नरोडे हे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *