Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस उपनिरीक्षक कडनोर यांना राष्ट्रपतीपदक जाहीर

पोलीस उपनिरीक्षक कडनोर यांना राष्ट्रपतीपदक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day of India )पूर्वसंध्येला पोलीस दलात 32 वर्षे 7 महिने सेवा देणार्‍या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राजाराम कडनोर (Dattatray Rajaram Kadnor )यांना राष्ट्रपती पदक तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुकदेव खंडू मुरकटे ( Sukdev Khandu Murkute)यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पोलीस पदक जाहीर झाले .

- Advertisement -

कडनोर हे नाशिक शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून 1 जून 1991 साली भरती झाले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबईनाका पोलीस स्टेशन व मध्यवर्ती गुन्हेशाखा येथे नोकरी करीत असतांना खून, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्हयांची उकल करून तपासकामी मदत केली आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना 15 गावठी पिस्तूल हस्तगत केले होते.

भद्रकाली पोलीस ठाणे येथे 65 मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्यांनी तपास केलेल्या 12 गंभीर गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झाली आहे. पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 2017 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पदक व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले आहे. त्यांनी अनेक गंभीर गुन्हयांची उकल, एमपीडीए व मोक्का सारख्या कारवाया करून चैनस्नॅचिंग, मोटारसायकल चोरी या गुन्ह्यांत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्याना आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरीबद्दल 377 बक्षिसे व 35 प्रशस्तीपत्र मिळाली आहेत. या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेची केंद्र शासनाने दखल घेवून राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे.

पोलीस पदक जाहीर झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुकदेव मुरकुटे हे 18 जून 1990 रोजी पोलीस दलात रुजु झाले आहे. मनमाड, येवला शहर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक नाशिक, आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण व सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक असा त्यांचा प्रवास आहे.

मनमाड येथे असताना दरोड्यातील आंतरराज्य दरोडेखोरांचे टोळीतील आरोपी केवळ वायरलेस वरील वर्णनाच्या आधारे पकडून दरोडा उघडकीस आणून त्यांच्याकडून दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत केला होता. येवला येथे असताना रात्र गस्तीचे वेळी राज्य महामार्गावर दरोडे टाकणार्‍या आंतरराज्य दरोडेखोराच्या टोळीने बंदुकीतून फायर केल्यानंतरही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना बंदुकीसह पकडले होते.त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन केंद्र शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवे करिता पोलीस पदक जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या