Friday, April 26, 2024
Homeनगरराष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य दिनकरराव टेकणे यांचे निधन

राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य दिनकरराव टेकणे यांचे निधन

भेंडा l वार्ताहर l Bhenda

येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य दिनकरराव टेकणे (वय 76 वर्षे) यांचे निधन आज भेंडा येथे निधन झाले.

- Advertisement -

मुळ नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथील रहिवासी असलेले श्री. टेकणे हे सन 1981-82 या शैक्षणिक वर्षात भेंडा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर रूजू झाले होते. दिनकरराव टेकणे यांनी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालयाचे उच्च माध्यमिक विद्यालय यासह महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक विभाग उभे करण्यात मोलाची भूमिका निभावली होती.

करोना अ‍ॅन्टीजेन कीटचा संगमनेरात काळाबाजार

त्यामुळेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पदावरून निवृत्त झाले तरी ही घुले परिवाराने त्यांना जिजामाता पब्लिक स्कुलचे प्राचार्य व श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत ठेवले होते.श्री.टेकणे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना

5 सप्टेंबर 1996 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च अशा “राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.नगर व पुणे येथील रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले नंतर ते भेंडा कारखाना वसाहतीतील आपल्या निवास स्थानी परतले होते. मात्र अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचे बुधवार दि.21 एप्रिल रोजी निधन झाले. माळी चिंचोरा या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, सचिव अनिल शेवाळे यांनी शोक व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या