Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपती रामनाथ कोविंद 'रायगड'ला भेट देणार, तारीखही ठरली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘रायगड’ला भेट देणार, तारीखही ठरली

मुंबई l Mumbai

देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला (Raigad) भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

संभाजीराजेंनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत. ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे’ असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता राष्ट्रपती रायगडाला भेट देणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या