Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी किल्ले रायगड सज्ज; शिवप्रेमींमध्ये उत्साह

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी किल्ले रायगड सज्ज; शिवप्रेमींमध्ये उत्साह

मुंबई l Mumbai

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) आज रायगड दौऱ्यावर (Raigad Fort) आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला (Raigad) भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत.

- Advertisement -

खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे.

दरम्यान, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर १९८५ ला होते. त्यानंतर ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती गडाला भेट देणार आहेत. यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८० ला रायगडावर आल्या होत्या. त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण झाले. या घटनेला पस्तीस वर्षे झाली आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येणार असल्यामुळे किल्ले रायगड आणि परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलं आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विविध स्तरांवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीय.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई विमानतळावरून भारतीय वायूदलाच्या MI17 हेलिकाँप्टरमधून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात निर्माण केलेल्या हॅलिपॅडवर उतरतील. त्यानंतर रोप वेच्या माध्यमातून राष्ट्रपती किल्ले रायगडावर पोहोचतील.

किल्ले रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर्वात प्रथम राज सदरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मानाचा मुजरा करून अभिवादन करतील. त्यानंतर रायगड किल्याची पहाणी करत होळीच्या माळावर राष्ट्रपती येतील. तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अभिवादन करतील.

त्यानंतर राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर वंदन करण्यासाठी जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या किल्ले रायगड दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि संभाजीराजे छत्रपती असणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या