Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनाशिकमधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : आचार्य प्रल्हाद केशव अत्रेे

नाशिकमधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : आचार्य प्रल्हाद केशव अत्रेे

1942 मध्ये नाशिकला झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांच्या त्या वेळच्या भाषणावर द्वितीय महायुद्धाचे सावट होते. त्यांनी आपल्या भाषणात जगाच्या व देशाच्या परिस्थितीची नोंद घेतली होती.

साहित्य, कला राजाश्रय व लोकाश्रय, लोकवांगमय इत्यादींचा विचार केला. लेखकांना अनुभव, ज्ञान,अवलोकन आणि कल्पनाही पाहिजे असे ते म्हणाले होते. साहित्याचा समाजजीवनाच्या प्रत्येक विभागाची संबंध येत असल्यामुळे सर्व विषयांची लेखकाला माहिती असावी लागते असे ते म्हणाले. लेखकाला केवळ प्रतिभा असून भागत नाही तर तिला निरीक्षणांची, कायम व्यासंगाची आवश्यकता असते.

- Advertisement -

लेखकांनी मानवतेची सनद लिहिण्यासाठी तयार असायला हवे असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले होते. आचार्य अत्रे यांनी कथा, कादंबरी, नाटक, गीते, आत्मचरित्र, कविता, विडंबन कविता, निबंध इत्यादी साहित्य प्रकार हाताळले.

ते जसे साहित्यिक होते तसे पत्रकार, राजकारणी, चित्रपट निर्माता, शिक्षक होते. असा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा, टोकदार लेखणी असलेला, प्रतिभासंपन्न साहित्यिक नाशिकच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता ही गोष्ट आनंददायीच.

: मिलिंद मधुकर चिंधडे, 9423968964.

- Advertisment -

ताज्या बातम्या