Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशअमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनमध्ये दाखल, चर्चांना उधाण...

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनमध्ये दाखल, चर्चांना उधाण…

दिल्ली | Delhi

रशिया आणि युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. अजूनही रशिया युक्रेनवर विविध पद्धतीने हल्ले करत आहे, तर युक्रेनही पराभव स्विकारायला तयार नाही.

- Advertisement -

या दरम्यान, अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहोचले आहेत. ते तिथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत दिसून आले. बायडेन यांचा हा दौरा अत्यंत आश्चर्यकारक आहे. याची पुसटशीही कल्पना कुणाला देण्यात आली नव्हती.

बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यापूर्वी स्पेशल नो-फ्लाय झोन तयार करण्यात आला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोमानियाच्या एअर स्पेसद्वारे कीव्हला पोहोचल्याची चर्चा आहे. येथे उपस्थित झेलेन्स्कींनी त्यांचे स्वागत केले.

दोन्ही देशांमधील युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाले होते. येत्या २४ फेब्रुवारीला या गोष्टीला वर्षपूर्ण होणार आहे. मात्र, वर्षपूर्तीपुर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, बायडेन आणि झेलेन्स्की यांच्या भेटीचे काही छायाचित्रेदेखील समोर आली असून, यामध्ये बायडेन आणि झेलेन्स्की सोबत दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान, विविध मुद्द्यांसह एका मोठ्या योजनेवर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या