Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशराष्ट्रपती निवडणुकीचा बिगुल वाजला

राष्ट्रपती निवडणुकीचा बिगुल वाजला

दिल्ली | Delhi

देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाच्या (President election) निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) त्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ जून ते २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २ जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.

निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये.

- Advertisment -

ताज्या बातम्या